चिमणशेठला मुल्ला नसरुद्दीनने पिण्यास पाणी मागितले. उंच गादीवर रुबाबात बसलेला चिमणशेठ त्याला म्हणाला, “माझा माणूस कामावर नाही, तु पुढे जाऊन पी. दुसऱ्या दिवशी परत त्याच फकीराने चिमणशेठला पाणी मागितले. चिमणशेठ म्हणाला, पुढे जाऊन प्या, माझा माणूस जरा बाहेर गेला आहे.
मुल्ला नसरुद्दीन हसत-हसत चिमणशेठला म्हणाला, “शेठ-तुम्ही कधी माणूस होणार?”
आज पुन्हा कवयित्री बहिणाबाईच्या त्या ओळीवर चिंतनाची गरज आहे, “अरे माणसा-माणसा, कधी होशील रे तू माणूस?”
मनुष्यातील मनुष्यत्व जागवण्यासाठी त्याच्या मनाचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे.
त्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे.
१० दिवसाची विपश्यना ध्यान पद्धती हा ध्यानाचा शास्त्रोक्त मार्ग आहे. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
एकदा का होईना मित्रांनो हे शिबीर करा. ते पूर्णतः विनामूल्य असते.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
