आतातरी सुधारा

नवीन लग्न झालेल्या मुलाला आईवडील उपदेशाचा डोस पाजतात. संसार नीट सुरळीत करायचा असेल तर बायकोला डोक्यावर बसवू नको. तिचे जास्त ऐकू नको. धाकात ठेव. अगदी पायापासशी वस्तू पायाशीच बरी असा घाणेरडा विचार वारंवार आपल्या मुलाच्या मनावर बिंबवतात. तरुण मुले हा उपदेश अंमलात आणणे सुरू करतात. त्याचवेळी पोरीची आई पोरीला रोज फोन करून घरातल्या नाहक चौकशा करताकरता नवऱ्याला तुझ्या मुठीत ठेव जास्त अडचण वाटत असेल तर वेगळं रहायला जा असा उपदेश करत असते. नवरी मुलगी या उपदेशाचे आचरण करणे सुरू करते. दोघेही एकमेकांना मुठीत ठेवण्यासाठी आईबापांच्या उपदेशांप्रमाणे पूर्ण ताकद लावतात. व त्यातून हिंसेचा उदय होतो. विभक्तपणाच्या विचारांना सुरुवात होते. त्यात अजून मुलीची आई रोज फोन करून हस्तक्षेप करू लागली की हिंसेचा आलेख वाढतो. व मुलामुलींचा संसार तुटतो. जुन्या विचारसरणीच्या पालकांनो आतातरी सुधरा. नाहीतर आपल्या मुलामुलींचे संसार विस्कटतील.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!