आनंद हा आपल्या आतूनच आला पाहिजे

बऱ्याच चांगल्या लोकांची गाडी एकाच रुळावर अडकून पडली आहे. ते स्वतःलाच असे समजवतात की मी ठरावीक गोष्टी केल्या तरच आनंदी होईन आणि जीवनाचा उपभोग घेईन. उदाहरणार्थ:

मला आदर्श असा आयुष्याचा जोडीदार मिळाला की मी आनंदी होईन.

जेव्हा मी तंदुरुस्त असेन, माझे स्नायू पिळदार असतील आणि माझ्या चेहऱ्यावर शुभ्र-हास्य झळकत असेल तेव्हा मी आनंदी असेन.

जेव्हा माझ्याकडे चांगली गाडी किंवा मस्त नोकरी असेल तेव्हा मी आनंदी होईन.

जेव्हा माझ्याकडे मुबलक पैसा आणि आर्थिक स्वातंत्र्य असेल तेव्हा मी आनंदी होईन.

जेव्हा बदलाचा वेग कमी होईल, राजकीय, सामाजिक आणि हवामानातील खळबळ शांत होईल आणि आपल्या ग्रहावरील गोंधळ कमी होईल तेव्हा मला आनंद होईल.

क्षमस्व, परंतु यापैकी एकही गोष्ट तुम्हाला कधीही आनंदी करू शकत नाही आणितुम्हाला आनंदी ठेवू शकत नाही-पण हा समाजाने मान्य केलेला एक भ्रम आहे, ज्याचा उद्देश आता भरकटलेला आहे. या गोष्टी तुम्हाला थोड्या काळासाठी आनंद देऊ शकतात, परंतु ते सुखापेक्षा वेगळे आहे.

तुम्हाला आतून वाटले तरच तुम्ही आनंदी होऊ शकता. आनंद ही एक अशी आंतरिक अवस्था आहे जी तुम्ही स्वतः निर्माण करता आणि अचानक एके दिवशी तुम्हाला योग्य जोडीदार, घर, नोकरी किंवा घड्याळ मिळते त्या भावनेऐवजी तुम्ही या स्थितीची निवड करता (तुमचे दैनंदिन विचार, सवयी, वर्तन, कर्तृत्व आणि साहस यांमधून).

 

                                                                                                                  आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!