लोकांना शुभेच्छा देत रहा

मला मान्य आहे की या संदेशाचं शीर्षक म्हणजे अगदी सर्वसामान्य कल्पना आहे तरीही प्रत्यक्ष जीवनात लोकांनी असं केलेलं सहसा आढळून येत नाही, लोकांचा दिवस चांगला जावा म्हणून त्यांना शुभेच्छा देणं.

 

आज सकाळी मी जिमला जाऊन परत येताना एका दुकानात गेलो. तिथे पाण्याची बाटली, बेरी आणि हिबिस्कस कोम्बूचा (hibiscus kombucha) घेतलं.

 

दुकानात एवढ्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असल्याबद्दल मी काऊंटरवरच्या तरुण मुलीकडे त्याचं कौतुक केलं. तिथे अगदी सहसा न दिसणाऱ्या प्रोटीन बारपासून मी आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्यांत छान क्वासाँपर्यंत (मी तो विकत घेतला नाही पण त्याचं स्वप्न पडलं की मी अजूनही रात्री घामाघूम होऊन जागा होतो) गोष्टी उपलब्ध होत्या.

 

मी कौतुकाचे शब्द बोलल्याबद्दल तिनं मला खूप छान पद्धतीनं धन्यवाद दिले. मी पैसे दिले.

 

निघताना मी म्हणालो, “तुमचा दिवस चांगला जावो.” त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. ती थांबली-माझ्याकडे लक्षपूर्वक बघितलं. मग म्हणाली, “तुमचाही दिवस चांगला जावो.”

 

एखाद्याची भावस्थिती चांगली करायला, त्याच्याशी चांगुलपणानं वागायला आणि तो माणूस इतरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे याची त्याला जाणीव करून द्यायला. फारसे काही कष्ट पडत नाहीत. “सगळ्यांशी प्रेमानं वागा, कारण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात समस्या असतातच,” स्कॉटलंडचे लेखक इयन मॅक्लारन (Ian Maclarl en) लिहितात,

 

माझा पूर्ण विश्वास आहे की एखाद्याला भेटल्यावर छान हसून मनापासून त्याला अभिवादन केलं आणि निरोप घेताना तुमचा दिवस चांगला जावो अशा शुभेच्छा दिल्या-तर आयुष्यातले बरचसे प्रश्न सुटतील. जरूर ही सवय लावून घ्या.

 

 

                                                                                                                आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!