विनोबांना इंग्रजांनी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एकवेळ पहारेकरी जेवण घेऊन येई आणि जिये प्रकाशही नसेल ते खचतील त्यांची प्रकृती खालावेल, ते निराश होऊन माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती. पण दिवस, आठवडे जसे जायला लागले, तसे विनोबा अजून तजेलदार, सशक्त दिसू लागले. तो जेलरही अचंबित झाला.
विनोबांनी २४ तासांचं नियोजन केलं, रोज ते जितके मैल चालत होते. त्या खोलोची लांबी मोजून साधारण रोजचं अंतर चालायला किती पावलं चालावं लागेल, हे अंतर काढून तेवढे तास ते त्या खोलीत चालत याशिवाय ध्यानधारणेचा वेळ त्यांनी वाढवला. याशिवाय जो पहारेकरी त्यांना जेवण घेऊन यायचा त्याच्या आयुष्यात काही दुःख आहे का? हे विचारून त्याला योग्य सल्ले दिल्यामुळे त्या जेलमधले इतर पहारेकरी आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले. त्यामुळे संध्याकाळचा वेळ सगळा लोकसमस्या निवारणात जाऊ लागला.
जे काही कच्चं भरडं अन्न मिळायचं तेही विनोबा समाधानाने चावून खायचे. व्यायाम तर होताच रोजचा. झोपही शांत लागत होती.
जेलर (इंग्रज) हे बघून थक्क झाला की, सायंकाळी इतकी लोकं त्यांच्याकडे येत आहेत आणि एकदा तो स्वतः बोलायला गेला आणि त्याने विनोबांना ही सभा रोज घेण्यासाठी जेलमध्ये स्वतंत्र वेगळी जागा दिली.
यापुढे जाऊन वाचनासाठी काही पुस्तकं मागावून घेतली. पुढे तर जेलमध्ये गीतेच्या प्रवचनांचे कैद्यांसाठी वर्ग सुरू झाले.
सगळं किती थक्क करणारं आहे मुद्दाम आज आठवलं. आपल्याला तर अंधारी कोठडी नाही घरात रहायचंय, आपल्याबरोबर आपले नातलग आहेत, मनोरंजनासाठी असंख्य गोष्टी आहेत. पर्याय कित्येक आहेत. तरी आपण दुःखी का आहोत. कारण सुख मिळवण्यासाठी सकारात्मकतेने विचार करणारं मन हवं आहे.
मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी दहा दिवसाचे विपश्यना शिबिर अवश्य करा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
