आसक्ती दुःखाचे कारण

मित्रांनो, तुमचा स्वतःचा स्वभावच जरा नीट पारखून पहा. तुम्ही रस्त्यातून जात असताना कोणाचातरी अपघात होतो. ती व्यक्ती रक्तबंबाळ झालेली असते. क्षणभर हे पाहून तुम्हाला जरा का होईना वाईट वाटते. पण ते सगळं विसरून लगेच तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागता. पण समजा असाच अपघात तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाला, किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीला झाला तर? … जोपर्यंत ती व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंत तुम्ही दुःख व चिंता यांच्या भोवऱ्यात फिरत राहता. मग असं का?
दोन्ही माणसंच आहेत, रक्त तर दोघांचंही वाहिलंय परंतु एकात तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि दुसऱ्यात नाही. जर तुमचा स्वभाव प्रेमळ असता. तर तुम्ही दोघांच्याही बाबतीत तितकेच दुःखी झाला असता. परंतु तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणालातरी तुमच्या इतकाच आपला मानत असता, आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला भोगावे लागत असते. अटॅचमेंट मधील एक महत्त्वाची गंमत अशी आहे की ज्याला तुम्ही आपला मानता त्याच्याशी जास्त संपर्क झाल्यामुळे त्याला एक प्रकारे त्रास देण्याचे काम तुमच्याकडून चालू होऊ शकत. जास्त इन्व्हॉलमेंट मुळे व्यक्ती एकमेकांवर अधिकार गाजवू पाहतात. त्यामुळे प्रसंगी एकमेकांचा छळ पण चालू होतो. एकमेकांकडून अपेक्षा जास्त वाढतात. जास्त अटॅचमेंट असल्यामुळे लहानसहान गोष्टीने देखील व्यक्ती चिंतीत व हैरान होते. जितक्या व्यक्ती मध्ये तुमची अटॅचमेंट, तितक्या पटीने तुमच आयुष्य कटकटीच होत. म्हणून जास्त अटॅचमेंट न ठेवता, एकमेकांवर प्रेम करा एकमेकांची काळजी घ्या. ‘अटॅच विथ डिटॅच’ ही संकल्पना प्रत्यक्ष आयुष्यात आणली गेली तर यातच सुखी संसाराचे सार आहे. लक्षात ठेवा परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट ही बदलणारी असते त्यामुळे एक दिवस ती व्यक्ती तरी बदलू शकते किंवा आपण तरी बदलू शकतो त्यामुळे मी आणि माझं यापासून दुःख निर्माण होऊ शकते त्यामुळे एकमेकांची मनापासून काळजी घेताना तटस्थ भाव ठेवून काम करा. निरपेक्षपणे सेवा करा. लक्षात ठेवा आसक्ती हे दुःखाचे मूळ कारण आहे…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!