क्षमा…

काॅलेज मधला मुलांनी भरलेला वर्ग… अचानक एक मुलगा उठून सरांकडे जाऊन म्हणाला, “सर, मला वडिलांनी आणलेलं किंमती घड्याळ चोरीला गेलं. आत्ता short break पर्यंत होतं.”

“त्यानंतर कोणी बाहेर गेलं नाही, आणि आतही आलं नाही,” असं म्हणत सरांनी वर्गाचे दरवाजे बंद केले. सर्व मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगितले. आणि एकेकाच्या खिशात हात घालून खिशात तपासायला लागले. खिसे तपासताना एका मुलाच्या खिशात एक घड्याळ सापडलं. डोळ्यावरून पट्ट्या काढून झाल्यानंतर ते ज्याचं होतं त्याला ते त्याचेच आहे याची खातरजमा करून देण्यात आलं. पण डोळ्यावर पट्ट्या असल्यामुळे ते कोणी घेतलं होतं हे कोणालाच कळलं नव्हतं.

काही वर्षांनी एका उद्योगपतीला प्रमुख पाहुणे म्हणून त्या शाळेत बोलवण्यात आलं होतं. आल्याबरोबर त्या उद्योगपतीने या सरांचे पाय धरले. म्हणाला, “मीच तो घड्याळ चोरलेला मुलगा आहे. तुम्ही माझं नाव उघड केलं असतं तर मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं, आज मी जिवंत उभा आहे ते तुम्ही नाव न कळू दिल्यामुळे!”

“तो मुलगा तू होतास होय?”
“म्हणजे काय सर?”
“अरे माझा कुठलाच विद्यार्थी माझ्या मनातून उतरू नये म्हणून मी पण डोळ्याला पट्टी बांधली होती.”

व्यक्तिमत्त्व घडवताना आत्मसन्मान जोपासणं फार महत्त्वाचं असतं. कोणाची निर्भत्सना करून तो खुडू नये. जमलं तर क्षमा करून त्याला पुन्हा एकदा उभारायला मदत करावी.

                                                                                                                                                     आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!