मनःशांती मिळवण्यासाठी जयंतीभाई २० वर्षापासून बापूमहाराज आश्रमात जायचे, पण मनःशांतीचा स्त्रोत काही त्यांना मिळत नव्हता. आश्रम सोडला कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या योगाच्या वर्गात त्यांनी याबाबत माझ्याशी चर्चा केली. मी त्यांना म्हटले १० वर्षे आश्रमात जाऊन बापूमहाराजांच्या शिकवणीने फरक पडत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी ध्यानपद्धती शिकायला जा. जिये तुम्हाला मनःशांती मिळेल असा दुसरा मार्ग शोधा. हे म्हणताच जयंतीभाई भययुक्त चेहरा करत म्हणाले. गुरूने कहा है, खड्डा एक ही जगह लेना है, देर सवेर पाणी लगेगा, जिधर उधर खड्डे लोगे तो कैसा पाणी लगेगा? कैसी प्यास बुझेगी? बापूमहाराजांनी उपदेशाचे डोस पाजून आपल्या गोठ्यात बांधलेल्या जयंतीभाईला मी एक गोष्ट सांगितली.
एका मानसशास्त्रज्ञाने आपल्या कोठडीत ५ लहान खोल्या तयार केल्या व ५ व्या खोलीत मिठाई ठेवून एक उंदीर सोडला. त्या उंदराने ५ व्या खोलीत जाऊन मिठाई फस्त केली. तीन दिवसानंतर त्याने मिठाई ३ न्य खोलीत ठेवली. उंदीर नेहमीप्रमाणे ५ व्या खोलीत गेला तेथे काही न मिळाल्याने ४थ्या खोलीत आला तेथून ३ ऱ्या खोलीत आला व तेथील मिठाई फस्त केली. उंदराला ५ व्या खोलीत मिठाई न मिळाल्याने तो इतर खोल्यात शोधत राहिला. माणसाला प्रज्ञा दिली असून तो अंधभक्तीने चौकटीत अडकतो. चौकट सोडायची त्याला भिती वाटते. व आपला गोठा मजबूत करण्यासाठी ‘एकही जगह खड्डा लो.” असा उपदेश करणारे गुरू आज जागोजागी दिसताहेत. म्हणून अध्यात्मात अंधश्रद्धाळू न बनता, चौकटीतील गुलामगिरीत न अडकता अंतर्मन व बुद्धीला जे पटेल व ज्याने स्वकल्याण व परकल्याण होईल अशा गोष्टींचे पाईक व्हा.
तुम्हीच तुमचे गुरू आहात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
