चष्मे बहादुर

राजू व गणेश दोघेही एकाच कारखान्यात काम करणारे जवळचे मित्र. नेहमी चेष्टामस्करी करणारा गणेश, राजूशी पूर्वीसारखे मनमोकळेपणाने बोलत नव्हता त्यातच राजूला प्रमोशन मिळाले. गणेशने त्याचे अभिनंदन केले पण त्याच्या चेहऱ्यावर फारसा आनंद नव्हता. राजूने प्रमोशननिमित्त ठेवलेल्या पार्टीला पण गणेश आला नाही राजूला गणेश आपल्या प्रगतीवर जळतोय या विचारांनी घेरले गणेशविषयी त्याच्या मनात द्वेष पसरला. जळकुकड्या म्हणून इतर मित्रासमोर राजूने गणेशच्या पश्चात अपशब्द वापरले. गणेश सलग ४ दिवस कामाला न आल्यगुळे साहेबांनी चौकशी करायला सांगितली म्हणून राजू व त्याचे सहकारी गणेशच्या घरी आले. घराला कुलूप होते. आजूबाजुला चौकशी केल्यावर गणेशच्या एकुलत्या एका मुलाला भाजल्याचे कळाले.
पैशाअभावी त्याने मुलाला सरकारी रूग्णालयात अॅडमिट केले होते. ससूनला राजू व त्याचे मित्र आले त्यावेळेस घरी गरम पाण्याचे पातेले अंगावर पडल्याने गणेशचा मुलगा ८०% भाजल्याचे त्यांना कळाले. राजूला बघताच गणेशने त्याला मिठी मारून ओक्साबोक्सी रडू लागला. राजूला सत्य कळाले. त्याने गणेश विषयीचा विचार न करता द्वेषाने लावलेल्या अदृश्य चष्मा त्याच्या लक्षात आला.
असे अनेक चष्मे गैरसमजातून आपण इतरांविषयी लावत असतो. कृपा करून चष्मा लावण्यापूर्वी चारही बाजूंनी त्या माणसाचा विचार करा. त्याच्या रोल मध्ये जा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!