वाचवा गुरूला वाचवा

जमीनीच्या वादातून राजेश व विजय यांची भांडणे चालू होती राजेशकडून काही रक्कम ही विजयला येणे बाकी होती. कोर्टाबाहेर राजेश व विजय यांची बाचाबाची झाली. विजयच्या कुटुंबाने राजेश व त्याच्या पत्नीला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. व या आठवडयात पैसे न दिल्यास घरी येऊन मारण्याची धमकी दिली. राजेशचे म्हणणे होते मी विजयला काहीही देणे लागत नाही.
टेन्शनमध्ये व भयभीत अवस्थेत राजेश त्याच्या गुरूकडे मठावर गेला व सविस्तर वृतांत गुरूजींना सांगितला. व गुरुजी मी काय करावे असा सल्ला त्याने मागितला. राजेश व त्याची पत्नी गुरुजीकडे ५ वर्षांपासून येत होते. गुरुजीचे श्रद्धाळू भक्त होते. गुरुजीनी ध्यान लावून राजेशला सांगितले आता विजय परत कधीही तुझ्याकडे येऊन तुला त्रास देणार नाही. मी माझे काम केले आहे.
दोन दिवसात विजय व त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्रांनी राजेश व त्याच्या पत्नीला जोरदार मारहाण केली. राजेशचा तर नाकाचा घोळांना फुटला.
मला ही सर्व घटना माहीत होती. मी राजेशला विचारले. गुरुजीचे बोल खोटे ठरले कि राजेश.
तेव्हा राजेश व त्याची पत्नी म्हणाली, गुरुजीच्या आशिर्वादाने थोडक्यात निभावलं साहेब, बाकी सगळा अनर्थ गुरुजींनी स्वतःवर ओढून घेतला. हे ऐकताच मला लक्षात आले की, ‘पागलों की कमी नही जालीम एक ढूंढो मिलते है हजारो.’

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!