टिळकांनी मंडालेल्या तुरुंगातून मुलाला पत्र लिहिले होते, मॅट्रीकनंतर तुला जे काही करायचं ते कर. तु चप्पलंच दुकान टाकलं तरी चालेल पण लोक म्हटली पाहिजेत, तुम्हाला चप्पल घ्यायची का? मग टिळकांच्या दुकानातूनच घ्या जे काही करशील ते उत्तमातील उत्तम कर.
सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी दोन चार क्लास लावून मुलाला इंजिनियर बनवलं असतं. पण मग आज क्रिकेटचा बादशहा सचिन उदयास आला असता का? अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. “माझ्या मुलाला जगात कसं जगावं, व विषम परिस्थितीत कसं वागावं हे शिकवा.
मित्रांनो अमेरिकेतून एम.एस. करून आलेल्या मुलाला मुंबईची लोकल पकडता येत नसेल तर काय उपयोग? म्हणून त्याला तुझ्यापेक्षा कमी मार्क असून तो करतोय मग तुला काय अडचण आहे?
किंवा दोन्ही विषयांचे क्लास लावू. पण तेच कर, हा आग्रह पालकांनी सोडला पहिजे.
मुलांच्या करियरसाठी अॅप्टीट्यूड, डीएमआयटी यासारख्या टेस्ट करून त्याच्या आवडीचे क्षेत्र त्याला निवडू द्या. बरखा, लतादीदीसारखं गाऊ शकणार नाही. सगळेच पी.टी. उषा सारखे पळू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगवेगळा आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
