हसण्याची सवय लावा

मित्रांनो, संभाषण करीत असताना नेहमी एक अडथळा येत असतो. तो म्हणजे बरीच लोकं हसत नाहीत. लोकांना तुम्ही रस्त्यात, ऑफिसमध्ये किंवा घरात पहा, किती वेळ ते हसत असतात. काही लोक तर बळंच हसून इतरांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु बारकाईने पाहणाऱ्याच्या नजरेत त्यांचा अप्रमाणिकपणा किंवा ढोंगीपणा लपून राहत नाही एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे पाहून नुसते स्मित हास्य जरी केले तरी पहा, तुम्हाला किती बरे वाटते. काही विक्रेते ग्राहकाकडे पाहून केवळ गोड व मनोवेधक हास्य करीत असतात. त्या वस्तू भांडारातील विक्री शेकडा २० टक्क्याने वाढलेली आपल्याला दिसून येते. स्मित करणाऱ्या व्यक्तीला आपण प्रतिसाद देतच असतो. अनेक लोकांना चेहऱ्यावर हास्य आणणे खूप अवघड जातं. त्यामुळे त्यांच्यापासून लोक दुरावतात. सुहास्य एक उत्तम अलंकार आहे. तो कुणाच्याही मुखकमलावर शोभून दिसतो. एकदा हसले की, २५० स्नायूंची हालचाल होते. चेहऱ्याला टवटवीत पणा येतो. चेहऱ्याला तजेलता येते. हसल्यामुळे आपला मूड पण चेंज होतो. कॉमेडी शो बघा. जोक सांगा व भरपूर हसा. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी हास्य आवश्यक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या हास्यक्लबने बऱ्याच बागेत हास्य क्लब चालू केले आहे. सकाळच्या वेळेला ही सगळी मंडळी एकत्र येतात. त्यांचे कृत्रिम हास्य पाहून इतर लोकांना देखील खूप हसू येते. म्हणून हसा आणि दीर्घायुषी व्हा. फक्त कुणालाही वाईट वाटे ल, कमी लेखले जाईल अस हास्य मात्र काही कामाचे नाही. स्वतः आनंदी राहा, इतरांना आनंद द्या.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!