।। सूर्यकिरणांचे महत्त्व ।।

 

सूर्यकिरणांत किती अमाप शक्ती असते याची आपल्याला कल्पनाही नसते. कोणत्याही ऋतूमध्ये सकाळची उन्हे उघड्या अंगावर घ्यावीत. सूर्यकिरणे शरीरात जावी इतका वेळ उन्हात बसावे. सूर्यकिरणांमुळे शरीराची कांती वाढते. सूर्यकिरण स्नानाने त्वचारोग, पंडुरोग व अनेक असाध्य रोग बरे होण्यास मदत होते. आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अर्घ्य देण्याची जी पद्धत शोधून काढली ती यासाठीच. धर्माबरोबर आरोग्याचाही विचार केलेला आहे. सूर्यकिरणे अंगावर पडल्याने मनुष्यामध्ये शौर्य निर्माण होते, तेजस्विता येते. वसंत ऋतूमध्ये वृक्षवेली जेवढे जास्त ऊन घेता येईल तेवढे घेतात. सूर्यकिरणांपासून प्रत्येकाला जीवन मिळते. म्हणून वृक्षवेलींना नवीन पालवी फुटते व पुढे वृक्षवेली बहरतात. जेव्हा उन्हे कमी असतात, थंडी असते त्या वेळी वृक्षवेलींची पाने गळून पडतात.

 

तांब्याच्या पसरट भांड्यात पाणी घेऊन ते सूर्यकिरणात एक-दोन तास ठेवून नंतर ताबडतोब ते पाणी प्याल्यास तब्येत सुधारते. सूर्यकिरणे पाण्यात जास्तीत जास्त जाण्यासाठी पसरट भांडे किंवा ताम्हण वापरावे. या पाण्याची चव थोडीशी निराळी असते. सूर्यकिरण व तांबे यांचा संयोग झाला पाहिजे. म्हणजे ही शक्ती पाण्यात उतरते. अशा तांब्याच्या भांड्यातील सूर्यप्रकाशात ठेवलेले पाणी प्यायल्याने नेत्रविकार, मेंदूविकार, रक्तविकार कमी होतात.

 

ज्या लाकडाला लोखंडाचा स्पर्श झालेला नाही किंवा खिळा मारलेला नसेल त्या लाकडावर भांडे भरून पाणी ठेवावे व ते सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी अस्तापर्यंत उन्हात ठेवावे म्हणजे सूर्यतीर्थ तयार होते. हे तीर्थ प्राशन केल्याने अंगावरील कुष्ठ नाहीसे होण्यास मदत होते.

 

समुद्राच्या पाण्यास जमिनीवर साचवून ठेवतात. सूर्यकिरणाने त्याचे बाष्पीभवन झाले की मीठ तयार होते. जमिनीवरील मातीशी संबंध येतो म्हणून हे मीठ काळ्या रंगाचे बनते. यात सर्व नैसर्गिक गुण असतात.

 

ईश्वरचिंतन हे सूर्योदयापूर्वी करावे. सूर्योदयानंतर नवीन नवीन विचार सुचू लागतात. सूर्यकिरणे व सूर्यप्रकाश मन जागृत करतात.

 

                                                                                                                                                         आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!