# आनंद #
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या!
स्वतःसाठी सारेच जगतात पण इतरांसाठी जगणारे फारंच थोडे असतात, आणि खरं आयुष्य तेच जगतात. तेव्हा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याहीपेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या, त्यासाठी दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळण्याचा छंद जोपासा… छोट्यांच्या, छोट्या छोट्या गोष्टीत असणाऱ्या आनंदात सहभागी व्हा, मोठ्यांच्या मोठमोठ्या गोष्टींमधल्या आनंदाला दाद द्या, पहा, निश्चितच सर्वांपेक्षा आपण किती तरी अधिक आनंदी असल्याची तुम्हाला जाणीव होईल. आनंदाचे काही क्षण असेही असतात की जे एकट्याने लुटताच येत नाहीत, ते वाटल्याने, शेअर केल्यानेच द्विगुणित होतात, ज्यापासून सारेच आनंदी होतात, आणि मग पहा, आनंदाच्या उत्सवात, सगळेच कसे उत्साहात एकत्रित येतात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-एक लेखक
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
