संघर्ष

◊ संघर्ष ◊

 

 

संघर्षातच माणूस एकटा असतो, यशात सारं जग बरोबर असतं !

बांधवांनो आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले तर, ज्यांच्या ज्यांच्यावर आजवर जग हसले आहे, त्यांनी त्यांनी इतिहास घडवला आहे. तेव्हा तुम्हीही संघर्षात असतांना एकटे असलात तरी विचलीत होण्याची गरज नाही. ध्येय उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न अखंडित व योग्य मार्गाने सुरु ठेवा आणि निश्चयाच्या बळावर पुढे व्हा, पहा तुम्हीसुध्दा तुमचे लक्ष्य गाठलेले असेल, होय, तुमच्या वाट्याला आलेल्या या संघर्षातून सर्वांनाच जावे लागते. त्यामुळे आपल्या सोबत असं का ?… असा विचारही मनात आणू नका, लक्षात ठेवा, आजचा संघर्ष हेच तुमचं उद्याचं यश आहे. नव्हे… तर एक यशस्वी, कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून संघर्षात तुम्हाला साथ न देणारं हेच सारं जग तुमच्या सोबत असेल.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!