आल्फ्रेड नोबेल याने डायनामाईट या विध्वंसक स्फोटकाचा शोध लावून त्याच्या विकीने कोट्यवधी रुपये कमावले होते. एक दिवस आ नोबेल या सारख्याच नावाचा एक दुसरा इसम मृत्युमुखी पडला. पत्रकारांना वाटले डायनामाईटचा निर्माता अल्फ्रेडचा मृत्यू झाला. पत्रकारांनी त्याच्या निधनाची बातमी लावली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रामध्ये या आल्फ्रेड नोबेल स्वत : च्या निधनाची बातमी वाचली. या बातमीत लिहिलं होतं की नोवेधक स्फोटकांचा जनक, कारण या स्फोटकांच्या विक्रीमुळे अनेकांन प्राण गमावले, मोठा विध्वंस धडून आला होता. ज्याने डायनामाईटच्या निर्मितीमुळे आर्थिक बळ मिळवले, तो अल्फ्रेड नोबेल सर्व काही इथेच ठेवून गेला जिवंत असलेल्या अल्फ्रेड नोबेलने ही बातमी वाचली, त्याला लोकांच्या मनातली त्याची प्रतिमा कळली. अल्फ्रेडला यामुळे खेद वाटला, त्याला खूप काही मिळवूनही हरल्याची भावना निर्माण झाली, कारण लोक त्याला एका परीने विध्वंसाला कारणीभूत मानत होते.
त्यानंतर अल्फ्रेडचे मनपरिवर्तन झाले. त्याने एक निर्णय घेत मिळवलेली सगळी संपत्ती चांगल्या कामासाठी दान द्यायची ठरवले. त्याने मिळवलेल्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा शांततेसाठी खर्च करायचा ठरवला, जागतिक पातळीवर शांतता नांदण्यासाठी त्याने फार महत्त्वाचे कार्य करत दानधर्मही केला. शांततेसाठी दिले जाणारे नोबेल पारितोषिकही या अल्फ्रेड नोबेलच्या नावाने दिले जाते. ज्या अल्फ्रेड नोबेलला विध्वसंकाचा जनक हे लेबल होते, ते त्याने स्वकर्तृत्व आणि कर्मान बदलले. त्यानंतर अल्फ्रेड नोबेलला ‘शांततेचा जनक’ हे लेबल लागले. त्यामुळेच आपल्या आयुष्यात असे काही कार्य करा. ज्यामुळे लोक आपल्यामागे काय बिरूद लावतील, याचा विचार करून कर्म करा. मानवी स्वभावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्वतःला कधीही बदलू शकता.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
