आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टीच कारण हे मानसिक असतं. तुमच्या भौतिक जगात तुम्ही जी गोष्ट निर्माण करता, त्याची सुरुवात कोणत्यातरी विचारानेच झालेली असते शहाजहानने ताजमहाल पहिल्यांदा मनातच बांधला. आर्किटेकट बिल्डिंग पहिल्यांदा मनात उभी करतो. नंतर चित्र रेखाटतो. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट बाहेरच्या बाजूने बदलायची असेल, तर पहिल्यांदा तुम्ही त्यात अंतर्गत बदल करायला सुरुवात केली पाहिजे जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्ही तुमचे विचार बदलायला हवेत. सगळ्या गोष्टीमधला हा सर्वांत मोठा शोध आहे. तुमच्या मनात सातत्याने सुरू असलेले विचार, भावना आणि कल्पना यामुळे तुम्ही तुमचं जग निर्माण करता. वर्तमानकाळात तुम्ही ज्या विचारांचा विचार करता, त्यावरून तुम्ही तुमचं भविष्य ठरवू शकता आणि त्यावर नियंत्रणही मिळवता. जोवर एखाद्या गोष्टीशी जोडलेल्या तुमच्या भावना आणि विचार त्या गोष्टीला काही अर्थ देत नाहीत, तोवर तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही. शेक्सपिअरनं हॅम्लेटमध्ये लिहिलं होतं, ‘कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, पण विचार तिला तसं बनवतात.’
विचार हे अचेतन मनातून जुन्या संस्काराच्या व अनुभवाच्या आधारे बाहेर पडत असतात. आपण जसा विचार करतो तशा प्रकारची तरंग आपल्या शरीरात निर्माण होतात. ही तरंग त्याच प्रकारच्या तरंगांना आपल्याकडे आकर्षित करतात.. आपण करत असलेला विचार त्यावर जर दृढ विश्वास ठेवला तर तशा प्रकारच्या व्यक्ती घटनास्थिती आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करणं चालू करतो. म्हणून म्हणतात विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. रोड्रा बर्न नावाची लेखिका म्हणते विचार बनाये जिंदगी..
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
