मला काही सांगायचय

मित्रांनो, कोरोनाच्या काळात काही जणांच्या नोकऱ्या गेल्या. २ लाख रुपये दरमहा पगार असणारी माणसे घरी बसली. दीड वर्ष झालं, अजूनही त्यांना नोक-या मिळाल्या नाहीत. आज अशा अनेक कुटुंबाची आर्थिक विवंचना झालीय मित्रांनो, आर्थिक कमकुवतता ताणतणावाच प्रमुख कारण आहे.
तथागत भगवान बुद्ध म्हणतात, “या जगात सगळ्या गोष्टी भरलेल्या पोटानेच करता येतात. म्हणून आता एकाच मार्गाच्या उत्पन्नावर अवलंबून राहू नका.”
वॉरन बफे म्हणतात, तुम्हाला १०० रु. एकाच मार्गाने येत असतील तर त्यावर विसंबून न राहता (एक-१) रुपया शंभर मार्गाने येऊ द्या. म्हणून उत्पन्नाचे अनेक मार्गाने स्रोत तयार करा. पुढचा काळ कसा आहे, कोणास ठाऊक? लक्षात ठेवा, “रुपयाचा हिशेब ठेवाल काटेकोर तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्वर.”

म्हणतात ना,

‘ना बापू बडा ना भय्या, द होल थिंग हिज देंट के भय्या, सबसे बड़ा रुपय्या.’ पैशामुळे रक्ताची नाती तुटलेली मी अनुभवली आहेत.

“वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामरे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे,” लोक म्हणतील, मेल्यानंतर काय पैसा वर घेऊन जाणार आहेस का?

लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात वर नेऊ शकतो. पैशाबरोबर जवळची माणसेही जोडा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!