चित्ताची चेतना

जीवनात यशस्वी होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी चित्ताची चेतना फार महत्त्वाची असते. चेतना म्हणजे हेतू. आपल्या कार्याच्या मागे एक चांगला सबळ उद्देश्य असेल तर ती पूर्ण करण्यासाठी निसर्गाची खूप मदत होते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश्य असेल तर ती पूर्ण करण्यासाठी निसर्गाची खूप मदत होते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश्य आपल्याला सुरक्षितता देतो व त्यामुळे आपला शारीरिक व मानसिक विकासही होतो.
एका गुन्हेगाराने एका इसमाला चाकूने १ इंच जखम केली व त्याच चाकूने डॉक्टरने त्याच इसमाला तेवढीच जखम केली तर दोघांना मिळणारे कर्मफळ वेगवेगळे असते, कारण डॉक्टरच्या चित्ताची चेतना आजाऱ्याचे ऑपरेशन करून त्याला रोगमुक्त करण्याचे असते तर गुन्हेगाराने केलेली जखम ही त्या माणसाला लुटण्यासाठी केलेली असते. मनाचा हेतू हा फळ देत असतो म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, “तुम्ही किती निस्वार्थी आहात, यावर तुमचे यश अवलंबून असते.”
आई आपल्या छोट्या मुलाला तो गरम तव्याकडे किंवा चुलीकडे जाऊ लागला तर जोराने दूर ढकलते, कधीकधी हे लहान लेकरू ढकलल्यानंतर जोरात जमिनीवर पडते व रडू लागते. पण आईच्या मनात त्या मुलाला विस्तवापासून भाजू नये हा विचार डोकावल्यामुळे ती जोरात बल लावून त्याला ढकलते. शेवटी चित्ताची चेतना महत्त्वाची असते. कुठलेही काम करण्यापुर्वी मनाची चेतना तपासून पहा. ती जर तुमच्या व समाजाच्या हिताची असेल तर निश्चितच निसर्ग तुम्हाला बळ देते आणि इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!