प्रभावी नेता

एका नामांकित कारखान्याला कामाची फार मोठी ऑर्डर मिळणार होती. मॅनेजिंग डायरेक्टरने कर्मचाऱ्यांना कामाची गती वाढवा आणि उत्पादन करा असं सांगितलं नाही त्याऐवजी त्याने सर्वांना एकत्रित केले आणि पूर्ण परिस्थिती विशद केली. त्याने सांगितले की जर ही ऑर्डर त्यांना मिळाली तर त्यांच्या कंपनीला खूप लाभ होईल आणि जर ती वेळेवर दिली गेली तर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यामुळे लाभ होईल. मग त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“आम्ही असं काही करू शकतो का की आम्हाला ही ऑर्डर मिळेल?”
“कुणाच्या डोक्यात असा काही उपाय आहे का, ज्यामुळे ही ऑर्डर घेणे आणि वेळेवर पूर्ण करणे शक्य होईल?”
‘असा काही उपाय आहे का ज्यामुळे आम्ही आमच्या कामाच्या वेळात बदल करून जी समयसीमा दिलीय, ती पूर्ण करू?”
कर्मचाऱ्यांनी अनेक उपाय सुचवले आणि त्यांनी ती ऑर्डर घ्यायलाच हवी असे त्यांनी आग्रहाने म्हटले, “आम्ही हे करू शकतो.” या भावनेने काम केलं, त्यामुळे त्यांना ऑर्डर तर मिळलीच, मालाचे उत्पादन आणि पुरवठा अगदी वेळेवर झाला. मॅनेजिंग डायरेक्टर ने सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या कर्मचाऱ्यांना महत्त्व दिले व ऑर्डर मिळाली तर त्यांचा कसा फायदा आहे हे त्यांना पटवून दिले त्यामुळे सर्व कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी ही ऑर्डर पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली.
प्रभावी नेता असे करतो… सर्वांना एकत्र करून पुढे जाणे यालाच ‘सबका साथ, सबका विकास’ असे म्हणतात…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!