पाहिजे ते मिळवा

विश्वातील सारे काही चुंबकीय असते आणि सगळ्यांना चुंबकीय लहर असते. तुमच्या भावना आणि विचारांनासुद्धा या चुंबकीय लहरी असतात चांगल्या भावना म्हणजे तुम्ही प्रेमाच्या सकारात्मक लहरीवर आहात. वाईट भावना म्हणजे तुम्ही वाईट लहरीवर आहात. तुम्हाला जसे वाटत असते, चांगले किंवा वाईट त्यावर तुमची लहर ठरत असते. आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही माणसे, कार्यक्रम, परिस्थिती यांना आकर्षित करू शकता !
तुम्हाला खूप उत्साही वाटत असेल तर तुमच्या या उत्साहाची लहर तशीच उत्साही माणसे, परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या भीतीची लहर तशीच घाबरट माणसे, भीतीदायक परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. तुमच्या या लहरीबद्दल तुमच्या मनात जराही शंका नको, कारण तुम्हाला त्यानुसारच अनुभव येतात. तुम्ही ह्या लहरी कधीही बदलू शकता, त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांमध्येही बदल करावा लागेल. आणि तुम्ही सकारात्मक असाल तर तुमच्या भोवतालचे सारे काही देखील बदलून जाईल. कोणत्याही प्रकारचे एखादे नाते, आनंदी, जोशपूर्ण, उत्साही, समाधानकारक, आणि प्रत्येक चांगल्या भावनेच्या लहरीनी भरलेले असू शकते. एखादे नाते बोअरींग, कंटाळवाणे, त्रासदायक, काळजी वाटायला लावणारे, उदासवाणे असू शकते.
ते वाईट भावनांच्या लहरीनी भरलेले असू शकते. त्या नात्याचे काहीही फलित असू शकते! आणि तुमच्या भावना ज्या प्रकारच्या आहेत तसेच नाते तुम्हाला मिळते. ज्या भावना तुम्ही देता तशाच भावना त्या नात्यामधून तुम्हाला अनुभवायला मिळतात.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!