तुमचे नाते अपडेट करा

आपली नाती तीच राहत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत जाते आणि ते बदललेच पाहिजे बदलत गेलेली नाती समजून घेता आली पाहिजेत नात्यातील प्रेम तसेच राहावे याकरिता नात्यांना ‘अपडेट’ करणे आवश्यक आहे नात्याला अपडेट करण्यासाठी आठवणीने त्याला किंवा तिला फोन केला पाहिजे. नात्यांची ‘टाईमलाईन’ चेक करा फेसबुकचा परवलीचा शब्द म्हणजे ‘टाईमलाईन’, आपल्या नात्यांची देखील ‘टाईमलाईन’ वेळोवेळी चेक केली पाहिजे. म्हणजे लक्षात येते आपल्या टेन्शनच्या वेळी कोणी आपल्याला कशी साथ दिली होती. आपल्या यशात कसे आनंदाने सगळे सहभागी झाले होते त्या ट्रीपला सगळ्यांनी कशी मजा मस्ती केली होती हे जर तुम्ही विचारात घेतले तर
आपल्यासोबत आपली माणसे आहेत याने तुम्हाला जगण्याचा हुरूप मिळेल. तुमच्या मनात जे काही असेल ते एकमेकांशी नेहमी शेअर करा. मनात कुढत बसू नका. शेअरिंग केले नाही तर गैरसमज होतात. नाते अपडेट करण्यासाठी सुख आणि दुःख नक्की शेअर करा
आपली गाडी चांगली चालावी यासाठी आपण जशी गाडीच्या सर्व्हिसिंगची तारीख चुकवत नाही, तशीच नात्यांची देखील सर्व्हिसिंग करावी लागते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या नात्यातील माणसावर उगाच चिडला असाल किंवा रागवला असाल तर, ते सगळे विसरून पुन्हा बोलणे
सुरु केले पाहिजे. मेल, फेसबुक, ट्विटर, स्काईप, मेसेंजर ही जी काही नवीन तंत्रज्ञाने आहेत, संपर्क माध्यमे आहेत. या संपर्क माध्यमांच्या वापराने आपण नात्यांमध्ये अपडेट होऊ शकतो.
मित्रांनो, खूप यश मिळवले आहे पण आनंद व्यक्त करायला जवळ नातेवाईकच नाही, माणसंच नाही तर त्या यशाचा काय उपयोग? म्हणून आपले मित्र मंडळी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवा. त्यासाठी वेळोवेळी नात्याच्या सॉफ्टवेअरला अपडेट करा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!