विद्वान सर्वत्र पुज्यते

 

परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडीलांनी बाबासाहेबांना सांगितल होते, भिमराव तु जास्त पैसे कमावले नाही तरी चालतील पण तु विद्वान हो. वडीलांचा हा उपदेश बाबासाहेबांनी कटाक्षाने अमलात आणला होता. तासन् तास बाबासाहेब वाचन करीत असत. एकदा महिनाअखेरीला त्यांनी वडीलांकडे दोन पुस्तके मागितली. ती विकत घेण्यास वडीलांकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून वडील आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या मुलीकडे गेले. तिच्याकडे पण पैसे नव्हते म्हणून वडीलांनी तिला विनंती करून तिचा लग्नात दिलेला एक दागिना घेतला व तो सावकाराकडे गहाण ठेवून
बाबासाहेबांना पुस्तके आणून दिली. या पुस्तकांमध्ये डोकं घालून बाबासाहेब एवढे महान झाले कि भारताचे संविधान त्यांनी लिहिले.
जागतिक महासत्तेचे गुरू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भाषणात म्हणाले होते, भारत लवकरच महासत्ता होईल याला काही कारणे आहेत. त्यापैकी सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान होय. आज विद्वत्तेच्या जोरावर संपूर्ण.जगात बाबासाहेब पुजनीय ठरले आहे. म्हणतात ना, स्वदेशे पुज्यते राजा
-विद्वान सर्वत्र पुज्यते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!