तासन् तास ज्याला बसवून अपमानास्पद वागणूक दिली होतीच तोच सुरेश आज कॅबिनेटमंत्री झाला होता त्याच्या पुण्यातील दौऱ्याची जबाबदारी साहेबांकडे आली होती. मित्रांनो कुणाचे दिवस कधी फिरतील मग ते (चांगले असोत अथवा वाईट) सांगता येत नाही.
राजाचा रंक व रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही जिंदगी में कुछ भी हो सकता है। सुशीलकुमार शिंदे कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारापासून- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा प्रवास सर्वांना ठाऊकच आहे.
लक्ष्मणराव किर्लोस्कर ड्रॉईंगचे शिक्षक होते. तेथून उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर उदयास आले. धीरूभाई अंबानी पेट्रोलपंपावर क्लार्क म्हणून ३०० रू. पगारावर नोकरी करत होते. आज लाखो लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे. पेपर विकणारा मुलगा ते राष्ट्रपती अब्दुल कलाम तुम्हाला माहीतच आहेत. माळीकाम करणारे निळु फुले पुढे नटसम्राट म्हणून उदयास आले.
बस कंडक्टर जॉनी वॉकर प्रवाशाची तिकिटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोकांना ब्लॅक ने विकत घ्यायला लागली.
त्यामुळे एखाद्या माणसाच्या आत्ताच्या स्थितीवरून त्यांच्याशी न वागता सगळ्यांशी प्रेमाने वागा. प्रत्येकाचा आदर करा. लक्षात ठेवा – भगवानबुद्ध म्हणतात, “सर्व अनित्य आहे.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
