त्याने असे कृत्य का केले

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतःलाही इजा करून घेतली होती. सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई बाबा उच्चशिक्षित, उच्च्वचस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला. आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता.
अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया (हुबेहूब माकडीणी) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान माकडांची पिल्ले त्यांच्याकडे सोडली. बटन व सेन्सरच्या माध्यमातून पाचही माकडीनीकडून त्यांना दुध पाजणे, जवळ घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांना झोपवणे या प्रकारची कार्ये ५ वर्षे त्यांच्याकडून करून घेतली.
५ वर्षानंतर सर्व माकडे तब्येतीने, शरीराने वाढली होती पण अॅबनॉर्मल होती. व हिंस्त्र झाली होती.
याच्या मुळाशी गेले असता, आईचे वात्सल्य, नैसर्गिक प्रेम, स्पर्श त्यांना मिळाला नव्हता.
मित्रांनो घराघरात आईवडलांची भांडणे, मुलांना प्रेम, सहवास न मिळणे या कारणांमुळे व पाहिजे त्या गोष्टी चटकन उपलब्ध झाल्यामुळे रागीट पिढी तयार होत आहे. प्रेमाची भुकेली ही मुले, त्यांना ते नाही मिळालं कि ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले होऊन मुले वाममार्गाला जात आहेत. म्हणून लहानपणापासून त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, मिठी द्या, त्यांचे कौतुक करा, आपलेणाची भावना निर्माण करा व आपल्या आचरणातून चांगले संस्कार द्या, नाहीतर घराघरात असे अॅबनॉर्मल हर्षल तयार होतील.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!