रतन टाटा कर्मचाऱ्यांशी कसे वागायचे?

 

रतनजी टाटा कर्मचाऱ्यांना आदराची व प्रेमाची वागणूक द्यायचे. प्रेमाने व नम्रतेने त्यांनी जग जिंकल होत. कर्मचाऱ्यांच्या बरोबर ते जेवायला बसायचे. कामगाराच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारायचे.. आणि मी असेही काही अधिकारी बघितले, जे नोकरदार आहेत परंतु वरच्या पोस्टला असल्यामुळे त्यांना एक प्रकारचा अहंकार आलेला असतो.. कर्मचारी केबिनमध्ये आल्यानंतर त्याला साधे बस देखील ते म्हणत नाहीत. दहा दहा मिनिटं उभे राहूनच त्याने बोलायचे असते. काही अधिकारी तर समोर बसलेल्या कर्मचाऱ्यांसमोर स्वतः चहा पीत, बिस्किट खात असतात. व कर्मचाऱ्यांना चड्या आवाजात प्रश्न विचारत असतात. पण. त्यांना हे कळत नाही, ते माणुसकीला अपमानित करत आहेत. कर्मचाऱ्यांना नाईलाजाने त्यांना येस सर, व रिस्पेक्ट द्यावाच लागतो.. परंतु हा रिस्पेक्ट त्यांच्या खुर्चीला असतो हे देखील त्यांना कळत नाही.. अशा अधिकाऱ्यांना ज्या वेळेला देवाचा चाबूक बसतो व कंपनी त्यांना बाहेर काढते. त्यावेळेला त्यांनी केलेल्या वाईट कर्मामुळे त्यांना बाहेर नोकरी मिळण्यास खूप जड जाते. या अधिकाऱ्यांना गेटच्या बाहेर कर्मचारी पाहतात व लांब निघून जातात.. मित्रांनो लेखन प्रपंच यासाठी, की तुम्ही कितीही मोठे झालात तरी माणसाशी माणसाप्रमाणे वागा.. तुमच्यासमोर असलेला माणूस हा कुठल्याही संस्थेचा, मंडळाचा, युनियनचा प्रमुख नसला तरी तो त्याच्या घरातील प्रमुख असतो हे लक्षात ठेवा. दिवस बदलतात. एक रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. तर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो. कल किसने देखा है.. म्हणून म्हणून सर्वांवर प्रेम करा, सर्वांना रिस्पेक्ट द्या. लक्षात ठेवा रामकृष्ण परमहंस म्हणाले होते, कुणाच्याही पायातील खडाव तूटल्याशिवाय राहत नाही… एकना एक दिवस प्रत्येकाला जमिनीवर यावेच लागते.. रतन टाटाजी व माझा कसलाही प्रकारचा संबंध आलेला नाही. परंतु त्यांच्या निधनाची बातमी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांची अंत्ययात्रा फेसबुकवर मी पाहत असताना, मी दोन मिनिटे हात जोडून भरलेल्या अश्रूंनी परमेश्वरा जवळ त्यांना स्वस्थ मुक्ती मिळो अशी प्रार्थना करत होतो..

आपला परिवार नागेबाबा परिवार

डॉ. दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर)
Mob. ९८२२६३२६३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!