एका माणसांवर एक भुत प्रसन्न झाले. त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सांगशील ते काम मी करिन, अट एकच मी कामाशिवाय स्वस्थ बसु शकत नाही. काम सांगितलं नाही, तर मी तुलाच खाऊन टाकेन. सुरवातीला त्या माणसाला आनंद झाला. त्याला वाटलं, काम तर कितीही सांगता येतील. झालं,.तो कामं सांगू लागला आणि क्षणार्धात भुत ते पार पाडू लागलं. शेवटी काम सांगायचं तरी काय? असा प्रश्न त्या माणसाला पडू लागला. एकदा त्यानं एका साधुला ही अड़चण सांगितली. साधूंन त्याला एक युक्ति सांगितली. भुतानं जसं माणसाकडे काम मागितलं, तसं त्यानं त्या युक्तिनुसार केलं. त्यानं एक खांब दाखविला आणि सांगितलं…, त्याच्यावर चढ़त आणि उतरत रहा. ते भुत त्याप्रमाणे करु लागलं आणि त्या खांबालाच जणु जखडलं गेलं. आपलं मन ही त्या भुताप्रमाणेच आहे. क्षणाचीही उसंत न घेता ते सदोदित धावत राहणारं आहे. ते कल्पनेशिवाय राहुच शकत नाही. स्वस्थ बसणं त्याला माहितीच नाही. त्यामुळे भौतिक जगात वेगाने भरकटत राहणाऱ्या या मनाला थोपविण्यासाठी सद्गुरु उपासनेचा खांब उभारतात. त्या मनाला उपासनेच्या खांबाला बांधून टाकतात. मग ते मन कितीही उड्या मारेना… ते त्या खांबापासून दूर जाऊच शकत नाही.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
