श्वेताने एका तासात 10 किमी अंतर कापले.
तर, आकाशने मात्र तेच अंतर दीड तासात कापले.
दोघांपैकी कोणता जलद आणि आरोग्यदायी आहे??
अर्थात आमचे उत्तर श्वेता असेल.
पण, श्वेताने हे अंतर एका तयार ट्रॅकवर कापले, तर आकाशने वालुकामय वाटेवरून हे अंतर पार केले असे म्हटले तर?
मग आमचे उत्तर असेल… आकाश.
पण जेव्हा आपल्याला कळते की श्वेता 50 वर्षांची आहे, तर आकाश 25 वर्षांचा आहे?
मग आमचे उत्तर पुन्हा श्वेता असेल.
पण जर आपल्याला सांगितले की आकाशचे वजन 140 किलो आहे, आणि श्वेताचे वजन 65 किलो आहे.
तर मग पुन्हा आमचे उत्तर आकाश हे असेल.
जसजसे आपण आकाश आणि श्वेताबद्दल अधिक जाणून घेतो, तसतसे कोण चांगले आहे याबद्दलची आपली मते आणि निर्णय बदलत जातील.
जीवनाचे वास्तवही असेच आहे.आपण खूप वरवरची आणि घाईघाईने मते बनवतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही.
संधी वेगवेगळ्या असतात.
आयुष्य वेगळे आहे.
संसाधने भिन्न आहेत.
समस्या बदलतात.
उपाय वेगळे आहेत.
त्यामुळे जीवनाची श्रेष्ठता आपली आणि आपल्यांची इतर कोणाशीही ‘तुलना’ करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यात आहे.एकेक दिवस मी कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काय आणि कसे करू शकतो ते पाहणं!
परमेश्वर आणि स्वतःवर विश्वास ठेवून
आपला प्रवास सर्वोत्तमाकडे होत आहे ना,याचा प्रयत्न हवा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
