दोऱ्या तोडा
एक व्यापारी आपल्या दोन उंटांवर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडेतिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहू लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला….
“अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध.” “महाराज, पण दोरी नाहीये”
पुजारी म्हणाला, “तू नुसतं दोरी बांधल्याचं नाटक कर.”
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटेखोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य
माणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निर्वात खाली बसला.
सकाळी पारी उठ्न, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली तो उंट उभा হারিয়ে दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच. म्हणून व्यापाऱ्याने दुसन्याला फक्त ‘झ्याक इयाक’ असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा ईट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान, तिथेच उभा असलेला पुजारी लागला.
तो म्हणाला…. “अरे. तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?” “पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती? नुसते नाटक केलं होते.”
पुजारी म्हणाला, “नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा.”
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य! तो दुसरा उंट तटकन उठला की !! ब्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला, “जसा हा उंट अदृश्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूडीमध्ये अडकलो आहोत.”
मित्रांनो, अदृश्य दोऱ्या तोडा.
कालबाह्य दोऱ्या कापा व आनंदाने रहा.
तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक ‘दोऱ्या’
सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल.
!!!
सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
