संस्कार

संस्कार

 

मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहोचला त्यांची आज पहिलो मुलाखत होती. तो घराबाहेर निघतांना विचार करत होता व त्याची इच्छा होती, जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या गावाला सोडून येथे शहरात स्थायिक होईल.

सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासून मुक्तता मिळेल.

सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा. मग बाथरूममध्ये जा, बाथरूमच्या बाहेर निघत नाही की मातोश्रीचे फर्मान

नळ बंद केला का?

टावेल जागेवर ठेवला की दिला फेकून?

नाश्ता करून घराबाहेर निघालो की लगेच वडिलांचा आवाज…

पंखा बंद केला की चालुच आहे?

काय काय ऐकावे, नुसता वैताग आला, यार…..
नोकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील आधिसमध्ये भरपूर उमेदवार बसलेले होते. बॉसची वाट पाहत होते दहा वाजलेले होते. तरीपण सरांडयात अजूनही तमईट चालूच होता, सोच आईची आठपण आलो, लाईट बंद केलाय का? अन उठून मी वर्गातील स्पाईट बंद केला

ऑफिसच्या दरवाज्याजवळ कोणीच नव्हते, बाजूला ठेवलेल्या वॉटर कुलरमधून पाणी टपकत होते, ते पाहून वडिलांचे रागावणे आटवले, म्हणून वाटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला. गळणारे पाणी बंद केले, समोर बोर्डवर लिहिलेले होते. ‘तुमचा इंटरव्यू वरच्या मजल्यावर आहे जिन्यातील लाइट चालूच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पाहलेली होती. ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरख्या मजल्यावर पोहोचलो व पाहिले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बॉसच्या केबिनमध्ये जात होते व लगेब बाहेर पडत होते.

तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले को, बॉस फाईल पाहून काहीच प्रश्न विचारत नाहीत आणि परत पाठवून देत आहेत असे समजले.

माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले मी दरवाजा बाजवून विचारले, “आत येऊ का, सर?” “एस, कम इन” आतून आवाज आला. बसण्यासाठी सूचना मिळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली,

फाईलमधील माझ्या कागदपत्रांवर नजर मारत असताना कोणताही प्रश्न न विचारता बॉसने विचारले, ‘केव्हा जॉईन करत आहात ?’

बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो. मला वाटले ते माझी गंमत करत आहेत, माझा चेहरा पाहून ते म्हणाले, “मी गंमत करीत नाही, हो वास्तविकता आहे”

आजच्या इंटरव्यूत कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही, फक्त सीसीटीव्हीमध्ये इंटरह्यूमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचालींमध्ये सर्व काही पाहिले, मुलाखतीसाठी बरेचजण आले. वॉटर कुलरचे गळणारे पाणी सर्वांनी पाहिले, पण दुर्लक्ष केले. व्हरांड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद
केला नाही, तो लाईट तुम्ही बंद केला. मध्येच रस्त्यात पडलेली खुर्ची सर्वांनी पाहिली, पण दुर्लक्ष केले, परंतु ती खुर्ची तुम्ही उचलली

धन्य तुमच्या पालकांना, ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले. ज्यांच्याजवळ Self Discipline नाही तो कितीही हुशार असला, चतुर असला तरी ती व्यक्ती मॅनेजमेंट आणि जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही.

घरी जाऊन आई-वडिलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले, तुम्ही केलेल्या संस्कारांमुळेच आज मला ही नोकरी मिळाली.

आपल्या जीवनात रोज रोज लहानसहान बाबीवर बोलणारे, नेहमी सूचना देणाऱ्या आई-वडीलांकडून मला जी शिस्त मिळाली, ती अनमोल आहे. या संस्कारक्षम, शिस्तप्रिय संस्कारांपुढे मी मिळवलेल्या पदवीची काहीच हैसियत नाही.

जीवनात फक्त शिक्षणच महत्वाचे नाही तर त्यासोबत आई वडिलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत.

जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत. चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं आहे. आयुष्याची घही व्यवस्थित बसवण्यासाठी शिस्त अंगात बाणा. शिस्तीनेच समृद्धी मिळेल

या संस्कारासाठी आई-वडिलांचं व शिक्षकांचं फार मोठं योगदान असेल तरच भावी पिढी सुखी व आनंदी होईल.

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

 

error: Content is protected !!