अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते…

♠  अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते…  ♠

मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंतर्गन, बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते.

बाह्यमनाने अंतर्मनाला दिलेली सूचना किंवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात अणण्यासाठी अंतर्मन प्रयत्नांची पराकाष्ठा करते. व जगातील सर्व प्राण्यांची अंतर्मन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात. म्हणून ‘या हृदयीचे त्या हदयी’ असे म्हणतात.

मित्रांनो, जो विचार तुम्ही अंतर्मनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला LAW OF ATTRACTION ‘आकर्षणाचा सिद्धांत’ असे म्हणतात.

भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. भगवान बुद्ध म्हणतात, “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल.” WHAT YOU THINK, YOU BECOME.

म्हणून म्हणतात, ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ‘विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल’.

आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारचे तरंग वातावरणात आहेत. तुम्ही ज्या चॅनलचे बटन दाबता तोच ट्युनअप होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होईल. म्हणून तुम्ही जो अँटेना लावतात त्याच प्रकारची तरंग तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करताल.

तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती,संधी आकर्षित कराल. WORD IS WORLD,THOUGHT IS WORLD. शब्द व विचार हे जग आहे. म्हणून सकारात्मक विचार करा. एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत ‘क्वांटम फिजिक्स’चं सिद्धांतानुसार ती फलदायी होते.

म्हणतात ना ‘किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में जुड़ जाती है’ म्हणून निर्भय होऊन आम्ही सर्व जन सुखी, निरोगी, आनंदी आहोत. सारे प्राणी सुखी आहेत. सर्वांच कल्याण होत आहे . अशी प्रार्थना वारंवार करा. डोळे बंद करून सर्व जग सुखी आहे. तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी व सुखी आहे असे भावनांसहित चलचित्र (Visualisation) पुन्हा पुनः बघा व सर्वांना संकटमुक्त केल्याबद्दल त्या वैश्विक शक्तीचे वारंवार आभार माना. याला कृतज्ञतेची साधना म्हणतात. मित्रांनो संकटातून बाहेर पडण्याचा आज हा उत्तम मार्ग आहे.
बाकी काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही. आकर्षणाचा सिद्धांत विस्ताराने समजून घेण्यासाठी रॉनड्रा बर्न यांचे ‘रहस्य’ पुस्तक अवश्य वाचा.

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!