नशीब घडवावं लागतं

 

मित्रांनो, कधीही पूर्णतः नशिबावर हवाला ठेवू नका. कधीही नशिबावर हवाला ठेवून राहू नका. जादूने अथवा नशिबाने अथवा दैववश तुम्हाला यशाची संधी मिळेल, या व्यर्थ आशेवर जगू नका. हे वास्तव लक्षात घ्या, की जर तुम्हाला काही मिळणार असेल तर ते मिळवणं तुमच्या स्वतःच्याच हातात आहे.
आता तुम्हाला आधीपासूनच हे माहीत असेल, की आयुष्यभर आपल्याला काही ना काही काम करावंच लागणार आहे, तर अशा वेळी तुम्ही आपल्या आवडीचंच काम करण्याचा निश्चय करा. कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही स्वतःची अत्यंत खास अशी प्रतिभा आणि क्षमता यांचा विकास घडवून आणा. आणि ते सर्व काही प्राप्त करा जे मिळविण्यास तुम्ही पात्र आहात. तुम्ही स्वतःच्या आवडीचं काम करा. आवडीच्या लोकांसमवेत काम करा आणि असं काम करा. जे तुमचं जग बदलवून टाकेल. तुम्ही स्वतःसाठी अत्यंत उच्च ध्येय ठेवा. आपला भविष्यकाळ आणि कारकीर्द यांबाबत सकारात्मकतेने आणि सक्षमतेने विचार करा. हे ओळखून काम करा, की जर एखादी गोष्ट दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत असेल, तर ते मी देखील निश्चितपणे करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, हे एकदा तुम्ही ओळखलंत की ते काम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडावं यासाठी त्यामध्ये स्वतःला अक्षरशः झोकून द्या.

स्वामी विवेकानंद म्हणतात,  “आयुष्यात तुम्ही एखादं ध्येय निवडलं, तर उठता-बसता, खाता-पिता हे ध्येय तुमच्या नजरेसमोर पाहिजे, तरच तुम्ही ते ध्येय प्राप्त करू शकता.  तुम्हाला मग कोणीच रोखू शकणार नाही.

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!