जिद्द

♥ जिद्द ♥

 

 

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण, मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही !

आपल्या आयुष्याचे मैदानही असेच आहे. ज्या मैदानात हरलेला माणूस जर त्याच्याकडे जिद्द असेल तर तो पुन्हा जिंकू शकतो, उभारी घेऊ शकतो, परंतु तो जर का मनाने हरलेला असेल, तर मात्र तो मानसिकदृष्ट्या खच्ची होऊन आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही. जसे की एखादा मैदानात हरलेला खेळाडू, क्रीडापटू त्याच्या खेळात हरुन सुद्धा पुन्हा मोठ्या जिद्दीने, सराव करुन मैदानात जाऊन जिंकू शकतो, आपल्या पराभवावर मात करुन आपल्या जिद्दीच्या जोरावर पुन्हा मैदान मारु शकतो. मित्रहो, जीवनात माणूस मनाने हरला (खचला) तर तो मात्र कधीच जिंकू शकणार नाही, लक्षात घ्या, मनावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही परिस्थितीत मन खंबीर असू द्या. मग पहा, तुमच्यासारखे जिद्दी आणि जिगरबाज तुम्हीच असाल. हर बार, हर क्षेत्र मे, यकिनन जीत तुम्हारी ही होगी.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!