कृतज्ञता

 

             कृतज्ञ रहा, त्या लोकांविषयी ज्यांनी वाईट काळात तुम्हाला साथ दिली त्यांना कधीही विसरू नका. चॉर्ल्स प्लम व्हितनाम मिशनचे हिरो होते. ते उत्तम पायलट होते. त्यांचं प्लेन क्रैश होण्यापूर्वी त्यांनी स्वतः लँडीग केले होते. या घटनेनंतर ८ वर्षांनी जर्मनीत ते एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना एक अनोळखी माणूस त्यांच्यासमोर येऊन म्हणाला, “तुम्ही चार्ल्स प्लम का? तुम्हाला मी ओळखतो.” चार्ल्सने त्या माणसाला विचारल, “तु कोण आहेस?” त्या माणसाने सांगितले, “मी तो माणूस आहे, ज्याने शेवटच्या फ्लाईटमधील आपले पॅराशुट पॅक केले होते. मी तो अँटेड आहे. ज्याने आपल्या फ्लाईटमधील पॅराशुट अगदी व्यवस्थित, पॅक केले होते.” चार्ल्सने हे वाक्य ऐकताच त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रु ओघळले. त्याने त्या माणसाला गच्च मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली. “तुझे माझ्यावर असलेले उपकार मी कधीच फेडू शकणार नाही.” असे म्हणत त्या माणसाला आपले कार्ड देऊन कधीही मदत माग मी तुझ्या मदतीसाठी सदैव हजर असेन, असे उद्‌गार काढत त्याला बरोबर भोजनाचा आग्रह केला. व यथायोग्य बक्षीसही दिले या कथेतून काय बोध घ्यायचा तुम्हीच घ्या. मी मात्र एवढेच म्हणेन कृतज्ञतेचा वारंवार अभ्यास करा.

 

         जो माणूस कृतज्ञतेचा अभ्यास करतो तो त्यावेळी उच्चतम तरंगांबरोबर एकरूप होत असतो. वॉशरूममध्ये गेल्यानंतर नळाला पाणी आल्यानंतर सकाळी उठून ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने पाणीपुरवठ्याचा व्हॉल फिरवला त्यानंतर ते पाणी टाकीत आल्यानंतर बिल्डिंगच्या वॉचमनने मोटर चालू करून ते वरच्या टाकीत भरले म्हणून आपल्या वॉशरूममधील नळाला पाणी आलं.

हे सर्व सहजपणे घेतो. आजपासून आपण ज्यांच्या ज्यांच्यामुळे आपले आयुष्य सुखी झाले आहे. आपल्या आयुष्यात प्रगती झाली आहे. आयुष्याला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. अशा सर्व लोकांना आठवून वारंवार कृतज्ञतेचा अभ्यास करुया.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!