परिपूर्ण कोणी नसतं…

मित्रांनो, प्रत्येक माणूस हा आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो. एखाद्या उत्तम वक्त्याला आपल्या कार्यक्रमाचे उत्तम मार्केटिंग करता येईल असे नव्हे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी करायचे असतील, तर त्या व्यक्तीने मार्केटिंग क्षेत्रातल्या तज्ञ माणसाशी पार्टनरशिप करणे आवश्यक असते. तर ती ट्रेनिंग कंपनी पुढे जाऊ शकते.
एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका गावात एकत्र भेटतात. गप्पा मारू लागतात. आंधळ्याला नीट दिसत नसते. त्यामुळे त्याला रस्ता पार करता येत नाही. काही लबाड लोकही त्याला काही वेळेला कमी पैसे टाकून जास्त पैसे घेऊन फसवतात. लंगड्या माणसाला चालता येत नाही. घोडं चाललं की त्याला खूप त्रास होतो. मग हे दोघेही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तयार होतात. लंगडा हा आंधळ्याच्या खांद्यावर बसतो. कुठे वळायचं, कसं वळायचं हे त्याला सांगू लागतो. थोडं दमल्यानंतर दोघेही एका झाडाखाली बसतात. मिळालेले पैसे दोघेही वाटून घेतात. दोघे एकमेकांना खूप मदत करतात. आंधळ्या माणसाने व लंगड्या माणसाने एकमेकांना एकमेकांच्या शक्ती दिल्या. त्यामुळे त्यांचे आयुष्य खूप छान चालले आहे.
खरोखर मित्रांनो, या जगात कोणीच परिपूर्ण नसतो. जे आपल्याकडे नाही त्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायची असते. जे आपल्याकडे आहे व दुसऱ्याकडे नाही त्याला आपण मदत करायची असते. व दोघांची प्रगती साध्य करायची असते. एकमेकांना साह्य करीत एकमेकांच्या आयुष्यात बाग फुलवायची असते. कारण या जगात कोणीच परिपूर्ण नसतो. म्हणून तर म्हणतात ना, ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!