रामचंद्रकाका निवृन होऊन दोन वर्ष उलटली होती. सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रूपये पेन्शन चालू होतो. एकुलता एक मुलगा अभिजित अमेरिकेतील नामांकित कंपनीत अधिकारी महणून नोकरी करता करता त्याच कंपनीतील अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन अमेरिकेत स्थायिक झाला होता रामचंद्रकाका व त्यांची पत्नी मालती आपल्या अलिशान बंगल्यात मोठ्या खुशीत दिवस काढत होते. एके दिवशी दुर्देवाने काळाने मालतीवर झडप घातली हृदयविकाराने मालतीचा मृत्यू झाला रामचंद्रकाका एकटे पहले मुलाने अमेरिकेतील कंपनीबरोबर ५ वर्षांचा करार केला होता. त्यालाही भारतात परतणे अवघड झाले.
सकाळी कामवाली शांताबाई येऊन साफसफाई व स्वयंपाक करून जायची पण दिवसभर काय करायचे? ६ खोल्यांचा टुमदार बंगला काकांना खायला उठायचा मालतीच्या आठवणीने काकांना व्याकुळता गायची रात्री बंगल्यात एकट्याला भिती वाटायची मनात बऱ्याचदा कामभावना जागृत व्हायच्या भविष्याची चिता मनाला अस्वस्थ करायची मनोमन काका नैराश्याकडे जायचे आपल्याला एकटे जगणे अशक्य आहे. कोणीतरी आपली काळजी घेणारी प्रेमळ सहचारिणी असावी असे त्यांना मनोमन वाटू लागले शरीराला वय असते, मनाला वय नसते काकांचे चिरतरूण मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पहात होते मुलाचे व त्यांचे संबंध मित्राप्रमाणे असल्याने त्यांनी मुलाला या गोष्टीबाबत फोनवर विचारणा केली असता, मुन्नाने त्यांना वय खानदान इज्जत समाज यासारख्या अनेक गोष्टीना अनुसरून अपमानित केले.
काकांच्या मनात स्वतःविषयी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आपले सर्वस्व असलेल्या एकुलत्या एका मुलाच्याही नजरेत आपण पडलो या भावनेने त्यांना नैराश्य आले. झोप उडाली मानसिक दुर्बलता आली आत्महत्येचे विचार मनात डोकावू लागले. त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार ते ध्यान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना पूर्णत बोलते करून मनाने हलके व मोकळे केले व त्यांच्या मुलाला फोनवरून त्यांना पितृऋण म्हणून मदत करण्यासाठी थोडं समाज-वय-प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. अभिजितने या विषयावर अमेरिकेत समुपदेशकाची मदत घेतली व समुपदेशनानंतर तो ६० वर्षाच्या आपल्या वडिलांच्या पुर्नविवाहाला तयार झाला पेपरला दिलेल्या जाहिरातीवरून ५८ वर्षांच्या विधवा सुमती काकूंचे व रामचंद्रकाकांचे सूर जुळाले. दोघांनीही एकमेकांना समजून घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला अभिजित त्याची बायको अमेरिकेतून सुट्टी काढून पुण्यात आले. आम्ही तिघांनीही काका काकुंना माझ्या कारमधून आळंदीला नेले व नोंदणी पद्धतीने त्यांचा पुर्नविवाह लावून दिला आपल्या टुमदार बंगल्यात हे वृद्ध जोडपे आनंदाने जगत आहे.
मित्रांनो, असे किती काका व काकू सामाजिक बंधनाच्या नातलगांच्या मुलाबाळांच्या भितीने एकटे जगायचे म्हणून जगत आहेत, नैराश्याकडे जात आहेत. आत्महत्या करत आहे एकटेपणा त्यांना सतावतोय म्हणून पुण्यात माधव दामले या इंजिनिअरने (फोन नं. ८००७१९३३९७) ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करून २५ काका- काकूंना एकत्र आणून विवाहबद्ध केले आहे.
वय झाले म्हणून कामजीवनाला पूर्णविराम द्या असे ज्येष्ठांना व एकाकी पडलेल्या काका-काकूंना म्हणणे व त्यांची वयानुसार चेष्टा मस्करी-टिंगल करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे यातून गैरप्रकार होण्याची दाट शक्यता असते त्यापेक्षा ज्याला खरंच वाटेल त्याला पुर्नविवाहाला मान्यता देणे शहाणपणाचं वाटते ज्येष्ठांच्या सुखसमाधानाऐवजी स्वतःच्या इगोला, समाजबंधनाला व घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जास्त महत्व देतो “माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे” असे सांगणाऱ्या कर्तव्यदक्ष मुलांना अत्र वस्त्र-निवारा एवढीच आईवडिलांची मर्यादित गरज नसते हे समजून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
फारच क्वचित काका काकू हे सामाजिक बंधन तोडण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांची मुले त्यांना सहाय्य करत आहेत शेवटी सरलेला अर्धा पेला भरणे हे पण आपल्याच हातात असते प्रत्येक माणसाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमभावना ही उचंबळून येतच असते. एका गीतकाराने म्हटले आहे ना,
“प्यार कभी मरता नही। मरते है इंसान ।।”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
