♠ आयुष्य ♠
जीवन खूप साधं सोपं, सरळ आहे आपण ते अवघड करतो !
खरंच, आयुष्यात अनेकदा आपणच आपल्या हाताने आपलं जीवन अवघड करुन ठेवत असतो. नकारात्मक गोष्टींचा बाऊ करुन उगाच नसती काळजी, चिंता करत जगत असतो. नको तिथं खरं आणि हवं तिथं खोटं बोलून विषय रबरासारखे ताणत नेत असतो, ज्यामुळे आपण विनाकारण ताण तणावात जाऊन अस्वस्थ होत असतो. एवढं सगळं करायचं खरचं का आपल्याला गरज असते, तर बिल्कुल नाही. त्यासाठी बस्स्, कमी बोला, खरं बोला, कृतीतून बोला, पहा, नक्कीच तुमचंही आयुष्य साधं, सरळ आणि कर्तृत्ववान बनेल… पहा मग जीवन साधं सरळ आहे, जीवनाचा खराखुरा अर्थ आणि आनंद साध्या सोप्या आणि सरळ जीवनातच आहे. असंच तुम्हीही म्हणाल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
