संसार टिकवायचा का?

बंधू-भगिनींनो, अलीकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. शिक्षणामुळे व श्रीमंतीमुळे अहंकार उदयास येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. माझा पगार त्याच्यापेक्षा जास्त या भावनेने मीपणा उंचावू लागला आहे. त्याचप्रमाणे एकमेकांकडून वाढत्या अपेक्षा. त्या पूर्ण होत नसल्यामुळे एकमेकांविषयी नाराजी वाढत आहे दिवसभर असलेला कामाचा ताण त्यामुळे आक्रमकता वाढू लागली आहे. ‘माझंच खरं’ या वाक्याला पुष्टी मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे मन अशांत व अस्वस्थ असल्याने एकमेकांविषयी प्रेम कमी होऊन संशयाचे भूत अनेक जणांच्या संसारामध्ये डोकावू लागलं आहे. लोकांना दाखवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा घेतलेले मोठे-मोठे फ्लॅट, दिमागदार गाड्या यामुळे कर्जाचे हप्ते डोक्यावर बसलेले आहेत. त्यामुळे ताण वाढला आहे. एकमेकांच कौतुक करायला लोकं कमी पडू लागली आहेत. दिवसभर कामाचा वाढता ताण, त्यामुळे घरी आल्यानंतर पण लोक आपल्या जोडीदाराला आज वेळ देऊ शकत नाहीत. हातात असलेला मोबाईल यास कारणीभूत ठरत आहे.
त्यामुळे मित्रांनो, आज बऱ्याच घरात अस्वस्थता, बैचेनी दिसून येत आहे म्हणून संसारात आनंदाची फुले फुलवण्यासाठी अहंकाराला थोडे दूर आहे खाण प्रयत्न करा. एकमेकांकडून जास्त अपेक्षा करू नका माझंच सुरः म्हणण्यापेक्षा दोन्ही बाजूने सारासार विचार करा. एकमेकांवर पूर्णत विश्वास ठेवून संशयाचं भूत दूर ठेवा व एकमेकांची काळजी घ्या. आपण करत असलेल्या व्यवहाराबाबत पारदर्शकता राहू द्या. एकमेकांना व्यवहाराची कल्पना द्या तुम्ही काही लपवून ठेवत असाल ही गोष्ट तुमच्या पार्टनरला कळाली की, अविश्वासाची दरी निर्माण होते. त्यामुळे पारदर्शकता ठेवून आपल्या पार्टनरचा आपल्यावरचा दृढविश्वास निर्माण करा. घरामध्ये आनंदी बातावरण तयार करा. शेवटी नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला शेवटपर्यंत साथ देणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी थोडं वय झाल्यानंतर पार्टनर देवाघरी गेल्यानंतर त्या माणसाला उतरती कळा चालू होते. त्यामुळे आपल्या जीवनसाथीला सांभाळून घ्या, त्याला प्रेम द्या. तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला परत मिळत असतं. परंतु प्रेम देण्यासाठी मनामध्ये प्रेमभाव जागृत झाला पाहिजे. त्यासाठी मन शुद्धीची गरज आहे. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ दहा मिनिटे का होईना ध्यान करा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!