व्हिजुअलायझेशन

मनः चक्षूपुढे एक काल्पनिक पडदा तयार करा तुम्हाला हवी असलेली कृती, तुम्ही त्या काल्पनिक पडद्यावर मनोमन करीत आहात. हे मनःचक्षूने पहा. सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत या भावनेवर येऊन तुम्हाला त्या मनःचक्षूने पाहता आल्या पाहिजेत.
तुम्हाला आरोग्य हवे असेल, तर तुम्ही पूर्ण निरोगी आहात अशी प्रतिमा तुम्हाला मनःपटलावर उभी करता आली पाहिजे. तुम्हाला पैसा हवा असेल, तर तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे, तो तुम्ही खर्च करीत आहात आणि त्याचा आनंदाने उपभोग घेत आहात अशी प्रतिमा तुम्हाला काल्पनिक पडद्यावर मनोमन पाहता आली पाहिजे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार व्हावा असे वाटत असेल, तर तुम्ही निर्माण करीत असलेल्या वस्तूंना भरपूर ग्राहकवर्ग लाभला आहे हे चित्र मनःपटलावर किंवा काल्पनिक पडद्यावर साकार करा. या प्रत्येक मानसचित्रात तुम्हाला तुमची प्रतिमा हसरी आणि समाधानी असलेली पाहता आली पाहिजे.
सुखावह स्थितीत डोळे बंद करून, शरीर संपूर्ण सैल सोडून निश्चल बसा. तुमच्या सर्व इच्छा प्रतिमांच्या रूपाने शक्य तितक्या स्पष्टपणे मनोमन पाहण्याचा प्रयत्न करा. निश्चित विचारांनी किंवा विधानांनी तुमच्या मानसप्रतिमा दृढ करा. तुम्हाला जे काही हवे असेल किंवा ज्या काही कृती करावयाच्या असतील, त्याबाबत त्या मानस-प्रतिमा तुम्हाला मार्गदर्शन करतील. हे व्हिजुअलायझेशन करता करता तुम्हाला जे काही हवं आहे. ते तुम्हाला मिळालं आहे. अशा स्वयंसूचना देणे चालू करा. ते तुम्हाला ईश्वराने दिले म्हणून कृतज्ञता मागणे पण चालू करा. जे काही तुम्ही अंतर्मनाने वारंवार बोलाल व मानस प्रतिमेद्वारे वारंवार पहाल तशा गोष्टी तुम्ही आकर्षित कराल….

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!