जी ले जरा

वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. पैसा, प्रसिद्धी, पद सगळं काही तिच्याकडे होतं. मित्रांनो मृत्यू कधीही झडप घालतो. जगून घ्या जरा. ओशो म्हणतात, ‘सुख का अर्थ है- जो मिला है, उसमे आनंद लेना, दुःख का अर्थ है -मुझे और -और चाहिए. मित्रांनो तृष्णा कधीच पूर्ण होत नसते. त्यामुळे जे आहे त्यात आनंदी रहा व प्रगतीसाठी कर्म करत रहा पण ते आसक्तीविरहित करा.
घरातील लोकांवर प्रेम करा. तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या. प्रेम व्यक्त करा. सहलीला जा. सुट्टी काढून आराम करा. आपल्या लाडक्या लेकरांना जवळ घ्या. आपल्या पत्नीला तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगा. आईवडीलांना गोडधोड खाऊ घाला. त्यांच्याजवळ बसा. त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करा. चित्रपट पाहण्याची, पुस्तके वाचण्याची, नाटक बघण्याची, नाचण्याची, पोहण्याची, खाण्यापिण्याची, फिरण्याची, व इतर मनोक्त इच्छा पूर्ण करून घ्या. सर्वांवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा.
भिक्षेकऱ्याच्या भिक्षापात्रात कितीही टाकलं तरी ते भिक्षापात्र भरत नव्हतं कारण ते माणसाच्या मेंदूच्या कवटीपासून बनवलं होतं. तृष्णा संपत नसते. म्हणून जे आहे त्यात आनंदाने जगणे शिका. जीवन खूप सुंदर आहे, त्यावर प्रेम करा व आनंदाने जगा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!