आपण सर्वच अध्यात्मिक आहोत…
दररोज सकाळ, संध्याकाळ देवाचे मंदिरात जातो…
त्यावर नतमस्तक होतो…
मात्र
असा कधी तरी मनात विचार आला का…?
ह्या मंदिरात असलेली मूर्ती ही एका पाषाणाची आहे…
तिला एकदाच कुणी तरी पारखी व्यक्तीने बघितल…
त्यावेळी ती मूर्ती नव्हती तर…
एक साधा आकार नसलेला ओबड धोबड दगड होता…
मात्र…
त्याच दगडातून एक सुंदर मूर्ती घडू शकतो…
अशी त्याला कल्पना सुचली…
आणि
पुढ काय तर त्याच दगडाचे रूपांतर सुंदर देखण्या मनमोहक सुबक अश्या मूर्तीत रूपांतर झालं…
तिची सवांद्या गावभर मिरवणूक निघाली…
तिला साज शृंगार घातला गेला…
आणि…
तोच दगड आज मूर्ती बनून देव झाला…
लक्षात ठेवा…
जर एक दगडाला आकार बदलतो तर तो देव होऊ शकतो…
तर आपण तर चांगले वाईट यातील फरक ओळखू शकतो…
त्यावरून जगायचं कसं याचा बोध घेऊ शकतो…
मग कधी केला का आपण विचार…
मी काय करावं…?
काय बोलावं…?
कस वागावं…?
म्हणुनच
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा…
कुणावर अन्याय किंवा कुणा विषयी वाईट बोलणे हे ज्या प्रमाणे नदीचे अथांग पाण्यात दगड फेकतो इतकं सोप आहे…
पण आपण तो विचार कधीच करत नाही…
जसा तो वरतून सहजच फेकलेला दगड हा अगदी त्या नदीचे तळाला जाऊन पडतो…
तसेच
आपण अगदीच कोणताही विचार न करता कुणाबद्दल ही काढलेली अपशब्द…
किंवा कुणा विषयी केलेली बदनामी ही त्या व्यक्तीच्या आयुष्याला बे रंग करून टाकत असते…
मग आपण हा विचार करू शकत नाही का…?
आपल्याला प्रभूंनी घडवलं…
सुंदर मनुष्य देह दिला…
त्याच्यात चांगले वाईट याचा विचार करण्याची क्षमता दिली…
त्याच देहाचा उपयोग…
त्याच तोंडाचा उपयोग…
सुंदर ग्रंथाचे वाचन करण्यासाठी करा…
आपल्या सोबतच्या सर्वांशी प्रेमाची चार गोड शब्द बोलण्यासाठी करा…
कारण
मनुष्याची जीभ ही अशी तलवार आहे…
जी चार माणसात बसवते…
चार माणसातून उठवते…
म्हणूनच
वाणी ला जपा…
तुमचा ही त्या दगडाचे मूर्ती प्रमाणे देव होण्यास वेळ लागणार नाही…
कारण
मंदिरात नुसत डोक ठेवून स्वार्थी भाव ठेवून स्वतःच भल्ल व्हावं म्हणून जायचं नसते…
मंदिरात यासाठी जायचं असत…
माझ्या कडून कधीच कुणाचे मन दुखवू नये…
कुणा विषयी ही वाईट भाव निर्माण होऊ नये…
कुणाबद्दल ही चुकून ही वाईट शब्द निघू नये…
कारण
विचारात मतभेद असू शकतात…
पण
कुणा विषयी मनभेद अजिबात नसावी…
बघाना…
पत्थर एक बार मंदिर गया भगवान बन गया…! आदमी जिंदगी भर मंदिर गया लेकिन इंसान ना बन पाया…!!
किसी को चोट पहुंचाना नदी में पत्थर फेंकने जितना आसान है…
लेकिन आप यह नहीं जानते कि ये कितने गहराई तक जा सकता है…
इसलिए अपने शब्दों को सोच समझकर ही इस्तेमाल करना चाहिए…
यावर एकच सांगतो…
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या माध्यमातून मिळालेली शिकवण सांगते…
एकमेका बद्दल परम प्रीती ठेवा…
पण
विशिष्ठ बुध्दी ठेवू नका…
कारण…
इथ आपला प्रवास हा त्या कैवल्य गडाचे दिशेने यासाठी करायचं आहे…
कुनापेक्षा मी कसा मोठा होइल या यासाठी नाही…
म्हणून
शब्दाची ओळख करून घ्या…
मुखात सतत त्या प्रभूच्या वचनाची आठवण नामाचे नित्य नेमाने नामस्मरण करा…
त्यातून तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक होईल…
त्यातून च आपला प्रवास हा त्या कैवल्य गडाचे दिशेने सुरू राहील…
कारण
जगात वेगळे कोणतंच आज तरी अस काही अमृत नाही…
जे मनुष्याला अमर करू शकते…
मात्र
प्रभूचे नाम हे खरोखर अस काही अमृत आहे…
त्या अमृत रुपी नामाचे रोजच सेवन केलं तर या शरीराचे नव्हे तर या जीवाचे कायम स्वरुपी सार्थक होईल…
म्हणूनच या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न करायला शिका…
निंदा रुपी विष तुमच्या तोंडात कधीच येणार नाही…
याआधी त्या प्रभूची आचार विचार समजून घेतली पाहिजे…
त्याचा अंगिकार केला पाहिजे…
तो आपल्या जीवनाला आकार देणार आहे…
म्हणून
शब्द ही विष आहे व अमृत ही
जपून वापरली तर अमृत आणि चुकीने वापरली तर विष…
दंडवत प्रणाम
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
