आभाराचं पत्र पाठवायला विसरू नका

 

मनापासून लिहिलेल्या, कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आभाराच्या पत्रांमध्ये खूप मोठी ताकद असते. जग बदलवून टाकण्याची. मी खरंच सांगतोय.

 

मी अशी पत्रं प्रत्येक वेळी पाठवत असतो. सुंदर कागदावर हातानं लिहिलेली. कधीकधी मला पत्र लिहायला अर्धा तासही लागू शकतो. कारण मी खूप विचार करून लिहितो. मला आठवतंय, एका सीईओंनी स्वतःसाठी एक नियम केला होता. दरवर्षी डिसेंबरमध्ये ख्रिसमसची पाच हजार ग्रीटिंग कार्ड्स पाठवायचा. ते जूनमध्येच लिहायला सुरुवात करायचे. लोकांना हे खूप छान वाटायचं. त्या सीईओंच्या दृष्टीनं आपण खूप महत्त्वाचे आहोत असं वाटायचं. या सीईओंकडे प्रचंड संपत्ती आहे. आर्थिक, माणसांची, आंतरिक, आध्यात्मिक.

 

घरी वापरण्यासाठी मी एक ट्रेडमिल विकत घेतली. ती खूपच छान चालते. म्हणून मी ज्या कंपनीनं ती बनवली तिच्या मालकांना एक पत्र लिहिलं. त्यात मी त्यांचे आभार मानले. इतकं सुंदर उत्पादन बाजारात आणल्याबद्दल आणि मला तंदुरुस्त राहण्यासाठी मदत केल्याबद्दल.

 

काही आठवड्यांपूर्वी मी एका वेगळ्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. रेस्टॉरंट साधंच होतं. तिथे चुलीवर बनवलेले स्थानिक पदार्थ मिळत होते. मी त्यांच्या शेफला आभाराचं पत्र पाठवलं. सुंदर जेवण बनवल्याबद्दल आणि मला त्याचा आनंद दिल्याबद्दल.मी आता प्रसिद्ध कादंबरीकार जेम्स पॅटरसन (James Patterson) यांचं द स्टोरीज ऑफ माय लाईफ (The Stories of My Life) हे अनुभवकथन वाचतोय. “द मर्डर ऑफ स्टीफन किंग” या प्रकरणात पॅटरसन सांगतात की त्यांनी याच नावाची लघुकथा लिहिली होती. त्या वेळी किंग यांच्या घरच्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि “ही कथा प्रकाशित करू नका” म्हणून सांगितलं. त्यांच्या मते किंग यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता (पूर्वी एकदा किंग यांच्या पत्नी तबिता (Tabitha) यांचं घर घुसखोरानं फोडलं होतं).

 

पॅटरसन यांनी त्या विनंतीला मान दिला आणि कथा प्रकाशित होऊ दिली नाही. त्यांचे प्रकाशक लिट्ल, ब्राऊन अँड कंपनीनं (Little, Brown and Company) त्या वेळी छापलेल्या सगळ्या प्रती परत मागवल्या. आणि त्यानंतर लेखकानं लिहिलंय, “आणि त्यासाठी त्यांनी साधं आभाराचं पत्रही पाठवलं नाही. मला वाटतं, त्यांना आभाराच्या पत्राविषयी नावड असावी.”

 

जे चांगली कामं करतात त्यांना आभाराचं पत्र पाठवत जा. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं यासाठी. तुमचं आयुष्य खूप समृद्ध व्हावं यासाठी….

 

                                                                                                      आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!