परान्न का घेऊ नये
बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एकदिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असंखूप दिवस चाललं. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा. एकदिवस त्याने
