Blog

माझं बरोबर, त्याचं चुकतंय

एका गावात ४ अंध मित्र राहत होते. एके दिवशी कोणीतरी त्यांना गावात हत्ती आल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांनी हत्तीविषयी फक्त ऐकले होते. चारही मित्रांनी विचार केला की हत्तीला स्पर्श करून पाहावे तरी तो नेमका कसा असतो. चारही मित्र हत्तीजवळ पोहोचले आणि त्याला स्पर्श करू लागले. एका मित्राने हत्तीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला, “मला समजले, हत्ती

माझं बरोबर, त्याचं चुकतंय Read More »

संघर्ष

संघर्ष तुम्हाला बलवान बनवतो. बऱ्याचदा संघर्षाचा काळ हाच खरा गुरू असतो आणि तोच तुमच्या पुढील यशाचा मार्ग निश्चित करतो. सुरवंट आणि त्याचा कोष हे उदाहरण अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करते. एका मुलाला घरच्या अंगणात सुरवंटाचा कोष मिळाला. काही दिवसांनी त्यात एक बारीकसे छिद्र आढळून आले. पुढील बराच काळ अतिशय संयमाने तो फुलपाखराला त्या बारीकश्या छिद्रातून बाहेर

संघर्ष Read More »

कल्पनाशक्तीचा विकास

एका व्यक्तीने राजाच्या दरबारात जाऊन तिथल्या साऱ्या विद्वानांना आव्हान दिलं, “मी जे सांगतो ते करून दाखवलं, तर मी आपली विद्वत्ता मान्य करून माझी हार मानेन…!” राजाने आपल्या पदरी असणाऱ्या विद्वानांच्या वतीने त्याचं आव्हान स्वीकारलं त्या व्यक्तीने कोंबडीचं अंडं दाखवून सांगितलं, “हे अंडं कुठल्याही आधाराशिवाय जमिनीवर उभं ठेवून दाखवावं.” सारेजण प्रयत्न करू लागले… पण अंडं उभं

कल्पनाशक्तीचा विकास Read More »

सकारात्मक दृष्टिकोन

एका गावात दोन साधू राहत होते. सकाळी उठून मंदिरात पूजाअर्चा करायचे आणि मग दिवसभर भिक्षा मागायचे आणि रात्री मंदीराशेजारीच झोपडीत रहायचे. एक दिवस गावात जोराचे वादळ आले आणि त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता की त्यात अनेक झाडे, प्राणी आणि अक्षरशः मोठमोठे दगडही वाहून गेले. सायंकाळी दोघे साधू आपल्या झोपडीजवळ

सकारात्मक दृष्टिकोन Read More »

बायकोचे महत्व

एकदा मालकाने गुलाब नावाच्या कर्मचाऱ्याला विचारलं, “तू बायकोला एवढं महत्त्व का देतोस?” त्यावेळेस गुलाब मालकाला म्हणाला, “साहेब, पत्नी कोणतेही नाते नसतानादेखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून ती आपल्या सोबत येते आणि आपले सगळे सुखदुःख एकत्र जगते. आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते.” तो पुढे म्हणाला, “साहेब, पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही, तर

बायकोचे महत्व Read More »

संतुलन साधा

जगातील सर्वात श्रीमंत अशा नऊ उद्योगपतीची अमेरिकेतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली. प्रत्येक जण आपल्या व्यापारातला अतिश्रीमंत उद्योगपती. एक जण हिऱ्यांचा जागतिक व्यापारी, दुसरा जागतिक स्तरावतील गॅस उत्पादक अग्रेसर उद्योगपती, तिसरा जागतिक स्तरावरील तेलाचा व्यापारी. थोडक्यात मोठमोठ्या उद्योगपतीची मांदियाळीच जणू तिचे लाभली होती. त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी एका संस्थेने या नऊ उद्योगपतींचा अभ्यास करण्यासाठी एक सर्वे

संतुलन साधा Read More »

बोलताना विचार करा

थॉमस अल्वा एडिसन हा महान शास्त्रज्ञ होता. मात्र त्यालाही लहानपणी कमी लेखले जाण्याचा अनुभव होता. एडिसन शाळेत जाई, एकदा त्याला शिक्षकाने शाळेतून परत पाठवले. शिवाय त्याच्याबरोबर एक चिठ्ठीही पाठवली आणि ती चिठ्ठी आईला द्यायला सांगितली. थॉमस घरी आल्यानंतर आईला त्याने ती चिठ्ठी दिली. आईने ती वाचली व तिने थॉमसला कडकडून मिठी मारली. थॉमसने तिला विचारलं,

बोलताना विचार करा Read More »

चित्ताची चेतना

जीवनात यशस्वी होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी चित्ताची चेतना फार महत्त्वाची असते. चेतना म्हणजे हेतू. आपल्या कार्याच्या मागे एक चांगला सबळ उद्देश्य असेल तर ती पूर्ण करण्यासाठी निसर्गाची खूप मदत होते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश्य असेल तर ती पूर्ण करण्यासाठी निसर्गाची खूप मदत होते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश्य आपल्याला सुरक्षितता देतो व त्यामुळे आपला शारीरिक व मानसिक

चित्ताची चेतना Read More »

नमस्कार तुमच्या खुर्चीला

दैनंदिन आयुष्यात आपण कशाला मान द्यायचा हे प्रत्येक जण ठरवत असले तरीही काही पदे ही मानाची असतात. तो मान त्या पदाचा, खुर्चीचा असतो. त्या पदावरून पायउतार होताच व्यक्तीचा मान दुसऱ्याच दिवशी कमी होतो. ब्रिगेडियर जोसेफ यांना नामांकित अशा मॅनेमेंट इन्स्टिट्युटच्या मुलांना लेक्चर देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ब्रिगेडियर जोसेफसाहेब सरकारी दिव्याच्या गाडीतून उतरताच इन्स्टिट्युटच्या डायरेक्टर

नमस्कार तुमच्या खुर्चीला Read More »

जशी दृष्टी – तशी सृष्टी

इसाप अथेन्समधील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली निवांत बसलेला होता. तेव्हा एक वाटसरू त्याच्यासमोर थांबला व त्याने इसापला विचारले, “अहो महाशय, मला या गावात राहायला येण्याची इच्छा आहे. मला सांगा या गावातील माणसे कशी आहेत?” इसाप त्याला म्हणाला, “तू जिथून येथे रहायला येणार आहेस त्या ठिकाणची माणसे कशी होती?” हा प्रश्न ऐकताच तो वाटसरू म्हणाला,

जशी दृष्टी – तशी सृष्टी Read More »

error: Content is protected !!