Blog

दृष्टिकोन-बदला

दोन नवोदित चित्रकारांनी राजाचे चित्र काढले. दोघांची चित्रं राजाला खूप आवडली. त्या चित्रकारांचा गौरव करण्यासाठी राजाने त्यांना दरबारात बोलावले. प्रत्येकाला एक उत्तम शाल व चांदीचे ताट राजाने भेट दिले, व त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यापैकी एक चित्रकार चांदीचे ताट मिळाले म्हणून खुशीत बाहेर पडला तर दुसरा चित्रकार मात्र उदास झाला होता. ज्या वेळेला त्याला उदासीचे

दृष्टिकोन-बदला Read More »

दुःखाचे कारण अति हाव

एक काल्पनिक गोष्ट आहे. सुदाम्याला आपल्या मित्राचे ऐश्वर्य नजरेत भरले आणि आपणही त्याच्यासारखे श्रीमंत व्हावे असे वाटू लागले, रात्रंदिवस तो या विचारांनी त्रस्त होता. कोणीतरी त्याला सांगितले की गावातील नदीकिनारी असलेल्या देवळातील मुंजाबा देव नवसाला पावतो. त्या देवाला ‘इच्छापुर्तीचं ठाणं’ असंही म्हणतात. सुदामा मग रोज तिथे जाऊन मुंजाबा देवाचं नामस्मरण करू लागला धूप-दिप-पूजा-अर्चा जोरात सुरू

दुःखाचे कारण अति हाव Read More »

चिंता सोडून द्या

मानसशास्राचा  एक प्राध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांना चिंतेवर विजय कसा मिळवायचा, हे शिकवत होता. त्याने एका विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असलेल्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलं व ते लोकांना दाखवायला सांगितले. सर्वांना वाटलं आता तो विचारेल की “अर्धा ग्लास भरला आहे की, अर्घा ग्लास रिकामा.” पण हसतहसत त्या प्राध्यापकाने त्या माणसाला विचारलं, “याचे वजन किती आहे?” ते वजन फार

चिंता सोडून द्या Read More »

राग तुमचा शत्रु

राग हा माणसाचा शत्रू आहे. अनेकदा रागाच्या भरात आपण जे वागतो त्याचा नंतर पश्चाताप होतो पण गोष्ट पुन्हा पहिल्यासारखे होणे शक्य नसते. मित्रांनो येरवडा जेलमध्ये ज्या वेळेस कैद्यांसाठी तणाव मुक्तीच्या कार्यशाळा मी घेत असतो, अनेक उच्चशिक्षित सुसंस्कृत घरातील मुले मला तेथे भेटतात. केवळ क्रोधावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून मोठा गुन्हा घडलेला असतो आणि त्यांना आयुष्यभर

राग तुमचा शत्रु Read More »

भपक्याला भुलू नका

          सीए झालेल्या मेघनाला बघायला स्थळ आले होते. नवरा-बायको दोघेही डॉक्टर व त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे. असे ते सांगत होते. येताना त्यांनी पन्नास लाखांची ‘ऑडी’ कार आणली होती. बोलताना त्यांनी आमचे दोन मजली स्वतःचे हॉस्पिटल व गावाकडे २० एकर जमीन असल्याचे मुलीच्या वडिलांना सांगितले. चौकशी अंती ‘ऑडी’कार त्यांच्या चुलत भावाची असल्याचे

भपक्याला भुलू नका Read More »

अपयशाने खचू नका

मित्रांनो, ‘अपयश ही यशाची एक एक पायरी आहे.’ असं आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, वाचलं असेल. त्यामुळे जीवनामध्ये कधीकधी अपयश आलं तरी खचून जाऊ नका. लांब उडी मारण्यासाठी कधीकधी दोन-तीन पावलं मागं जावं लागतं. आणि मग लांब उडी मारणं सहज सुलभ होऊन जातं. सुपरस्टार अमिताभ बच्चन साहेबांचे सुरुवातीचे बरेच चित्रपट अपयशी ठरले. कालांतराने त्यांच्या ‘अँग्री

अपयशाने खचू नका Read More »

कृतज्ञता

               कृतज्ञ रहा, त्या लोकांविषयी ज्यांनी वाईट काळात तुम्हाला साथ दिली त्यांना कधीही विसरू नका. चॉर्ल्स प्लम व्हितनाम मिशनचे हिरो होते. ते उत्तम पायलट होते. त्यांचं प्लेन क्रैश होण्यापूर्वी त्यांनी स्वतः लँडीग केले होते. या घटनेनंतर ८ वर्षांनी जर्मनीत ते एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना एक अनोळखी माणूस त्यांच्यासमोर

कृतज्ञता Read More »

इष्ट आपत्ती

             बीजिंगमधील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणीसाठी एक म्हातारा घोडा वापरत असे. एके दिवशी तो घोडा त्याच्या शेतातून टेकडीच्या दिशेने पळून गेला. शेजाऱ्यांनी शेतकऱ्याच्या दुर्दैवावर दुःख व्यक्त केले. त्यावर शेतकरी म्हणाला की, ‘कुणास ठाऊक हे सुदैव आहे की दुर्दैव?’ त्यानंतर शेतकऱ्याने नांगरट करण्यासाठी मुलाला त्याच्या मित्राकडून घोडा आणावयास लावला. तो

इष्ट आपत्ती Read More »

आनंदाच्या शोधात

सॅम्युअल अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. भल्यामोठ्या आलिशान गाडीतून आपल्या कौन्सिलरकडे गेला. आणि म्हणाला, “सर! मला असे वाटते की माझे संपूर्ण आयुष्य निरुपयोगी आहे, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही मला आनंद मिळविण्यासाठी मदत कराल का?” कौन्सिलरने तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बोलावले आणि तिने आपल्या जीवनात आनंद कसा मिळाला हे सांगण्यास सांगितले. त्या वृद्ध स्त्रीने

आनंदाच्या शोधात Read More »

त्याने आत्महत्या का केली ?

सागर हा दहावीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये पहिल्या पाचमध्ये आला होता. पेपरमध्ये त्याचे फोटो छापून आले होते. बारावीतदेखील तो बोर्डात आला होता. त्या भागातील लोकांनी त्याचा जंगी सत्कार केला होता नातेवाइकांनीदेखील सर्वांनी एकत्र येऊन सागरचा सत्कार समारंभ केला होता. उच्च शिक्षणासाठी सागर अमेरिकेला गेला. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याच ठिकाणी सागरला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये फार मोठी पोस्ट मिळाली.

त्याने आत्महत्या का केली ? Read More »

error: Content is protected !!