इष्ट आपत्ती
बीजिंगमधील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणीसाठी एक म्हातारा घोडा वापरत असे. एके दिवशी तो घोडा त्याच्या शेतातून टेकडीच्या दिशेने पळून गेला. शेजाऱ्यांनी शेतकऱ्याच्या दुर्दैवावर दुःख व्यक्त केले. त्यावर शेतकरी म्हणाला की, ‘कुणास ठाऊक हे सुदैव आहे की दुर्दैव?’ त्यानंतर शेतकऱ्याने नांगरट करण्यासाठी मुलाला त्याच्या मित्राकडून घोडा आणावयास लावला. तो



