क्रोधाची साखळी
♠ क्रोधाची साखळी ♠ मित्रांनो, जगाच्या बाजारात जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या, समजा, एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली, त्याला झाप झाप झापले. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतून खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय, पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच










