मनाची मशागत

मनाचे सामर्थ्य

  शिवाजी महाराजांवर तहात सगळे गड मुघलांना ताब्यात देण्याची वेळ आली. महाराज मनाने खचले. जिजाबाईने महाराजांना आपल्या जवळ घेऊन म्हटलं, “शिवा-माझ्या लेकरा, सगळं गेलं तरी चालेल, पण तुझ्या मनाची उभारी जाऊ देऊ नकोस.” आपल्या मुलाच्या मनाची खचलेली उभारी वाढवणारी माता जिजाऊ होती म्हणून शिवाजी महाराज जाणते राजे म्हणून उदयास आले. खरोखर मित्रांनो मनात प्रचंड प्रमाणावर

मनाचे सामर्थ्य Read More »

देवाचा मित्र

  एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघुम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. तो पाय सारखा वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असतानाही तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटलं. त्याने समोरच

देवाचा मित्र Read More »

सकारात्मक ऊर्जा

  एक फुगेवाला जत्रेमध्ये हेलियम वायू भरलेले (गॅसचे) फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. मध्येच तो एखादा फुगा आकाशात सोडायचा. उंच उडत जाणारा फुगा पाहून मुले फुगे घेण्यासाठी पालकांना आग्रह करायचे व त्याचा धंदा जोरात सुरु व्हायचा. एका लहान मुलाने या फुगेवाल्याला प्रश्न केला, काका या निळ्या रंगाच्या फुग्याप्रमाणे पिवळा रंगाचा फुगा पण आकाशात उडेल का ?

सकारात्मक ऊर्जा Read More »

माझिया मना !

  २० वर्षे नामांकित कारखान्याच्या नगर रोडच्या विभागामध्ये कामाला जात होतो. कारखान्यापासून १ कि.मी. अंतरावर घर, सर्व दिनचर्या, छान चालली होती. विभागामधील कर्मचाऱ्यांची मुख्य विभागामध्ये बदली करणार आहे अशी कुणकूण कानावर आली होती. एके दिवशी फॅक्टरी मॅनेजर आले व म्हणाले तुम्हा कर्मचाऱ्यांची काही कारणास्तव कोथरूडच्या मुख्य विभागामध्ये बदली करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ही बदली

माझिया मना ! Read More »

संघ

  एका फळविक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, “आज काय भाव आहे द्राक्षांचा…?” तो म्हणाला “साठ रू. किलो” जवळच, सुट्टी द्राक्षे ठेवली होती मी त्याला म्हणालो “यांचा काय भाव आहे”? तो म्हणाला “पंचवीस रूपये किलो” मी त्याला विचारले यांचा भाव साठ रूपये व यांचा भाव २५ रूपये इतका कमी असे का? तो म्हणाला साहेब दोन्हीही द्राक्ष

संघ Read More »

अकड किस बात कि प्यारे ?

  अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना, रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची एक गाडी अडचणीच्या जागेत अडकली. आतील शिपाई उत्तरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्यावरचा अंमलदार मात्र फक्त हुकूम देत जोराने ओरडत होता. त्यानेही थोडी मदत केली तर गाडी लगेच निघण्याचा संभव होता पण तो होता साहेब ! फक्त हुकूम देत उभे राहणे व खेकसनेच

अकड किस बात कि प्यारे ? Read More »

किर्ती रूपी उरावे

  ८४ वर्षे वयोमान असलेल्या माझ्या वडिलांना पाय घसरून पडल्याने जागेवरून उठताच येत नव्हते. गला ही वार्ता कळताच मी घरी पोहचलो आणि वडिलांना त्वरित हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो तपासण्यानंतर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. आम्ही होकार दिला. १ महिन। वडील हॉस्पीटलमध्ये होते. डिस्चार्ज घेऊन घरी आणल्यानंतर वडिलांनी धीर सोडला. मन कमकुवत केले व बरे

किर्ती रूपी उरावे Read More »

… आणि ती हसली

  शंकर महाराजांच्या मठासमोर सकाळी सकाळी दोन आजीबाई जोरजोरात भांडत होत्या. मठाच्या दारातच त्या भिक्षा मागताना दिसायच्या व तेथेच झोपायच्या. मठाच्या दारातच त्यांचं छप्परविरहित भिंतीविरहित घर. लोकांनी दिलेल्या भिक्षेवर त्यांचा उदनिर्वाह चालायचा. मी कारमधून उतरलो व त्यांच्या जवळ जाऊन भांडणाचे कारण विचारले. तेव्हा एक आजी म्हणाली, “हिनी माझी बाटली चोरली. आता मी पाणी कशानी पिऊ?”

… आणि ती हसली Read More »

बदल

  मुंबईवरून व्यवसायानिमित्त बऱ्याचदा पुण्यात येणाऱ्या सचिन ओसवाल नावाच्या माझ्या परिचयाच्या व्यापाऱ्याला मी टॅक्सीचालक रामप्रसादचा फोन नं. दिला होता, व त्याच्या उत्कृष्ट सेवेची व इमानदारीची स्तुती केली होती. सचिनने रामप्रसादला फोन करून सकाळी ११ वा. लोहगाव विमानतळावर बोलाबले होते. विमानतळावर बरोबर ११ वाजता विमानातून उतरल्यानंतर सचिनशेठला रिसिव्ह करण्यासाठी ‘वेलकम सचिन ओसवाल’ असा बोर्ड घेऊन रामप्रसाद

बदल Read More »

सामर्थ्य शब्दांचे

सुदर्शन इंडस्ट्री खूपच तोट्यात आल्यामुळे मेहता साहेबांनी पुण्यातील कारखान्यात व्ही. आर.एस. जाहीर केली व ज्यांना व्ही. आर. एस. घ्यावयाची नाही त्यांनी कंपनीच्या इंदौर येथील विभागात काम करण्यासाठी रूजू व्हावे असे पत्रक काढले. बऱ्यापैकी रिटायरमेंटला आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तेथे जास्त होती. व्ही.आर.एस. साठी ते पुढे आले. तरूण मुलांनी नाईलाजाने इंदौरला जाण्याची तयारी दर्शवली. कारखान्यातील नेतेगिरी करणारे

सामर्थ्य शब्दांचे Read More »

error: Content is protected !!