मनाची मशागत

देऊळ

  भैरवनाथाच्या मंदिराच्या मैदानावर हरिनाम सप्ताह चालू झाला. सलग सातही दिवस महादू न चुकता प्रवचनाला हजेरी लावायचा. महादूची आर्थिक परिस्थिती जरा बिकटच होतो पत्नीच्या व त्याच्या स्वभावात दोन टोकाचे अंतर त्यामुळे घरात रोजच भांडणे, अस्वस्थता, व्याकुळता याला महादू वैतागला होता. सलग सात दिवस का होईना या त्रासातून थोडं बाहेर पडावं म्हणून महादूने मनापासून या सत्संगाचा

देऊळ Read More »

जरा जपून

  प्रतिभा ही कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेतलेली तरूणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यासारख्या मुक्त वातावरणात वाढलेली तिने हाफ स्लिव्हचा टि-शर्ट घातलेला, स्वतःचा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंटस् वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच वर चढला. तुफान भांडणे, आरोप- प्रत्यारोप, शिवीगाळ – परिणाम आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे.

जरा जपून Read More »

जगु आनंदाने

  स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला अथांग महासागराच्या तीरावर उभे राहून समुद्राच्या मध्यभागी असलेल्या प्रचंड आकाराच्या शीळेकडे पहात होते त्या प्रचंड शीळेवर जाऊन ध्यानस्थ बसण्याची अंतस्थ उर्मी तेव्हा त्यांच्यात दाटून आली. पण जवळ कवडी देखील नव्हती शेवटी त्यांनी नावाड्याला तिथे नेण्याची विनंती केली परंतू पैशांअभावी नावाड्याने ती धुडकावून लावली तक्षणी विवेकानंदानी पाण्यात उडी घेतली आणि ते पोहत

जगु आनंदाने Read More »

… आणि तो मोकळा झाला

सकाळी १० वाजताच माझा वर्तमानपत्रातील लेख वाचून अक्षयने मला फोन केला. सर भेटायचे आहे आपली वेळ हवी आहे ठरल्याप्रमाणे ५ वा. अक्षय मला ध्यान केंद्रावर भेटायला आला. अक्षयचे डोळे आत गेलेले, चेहऱ्यावर निस्तेजता, गाल आत गेलेले, खांदे वाकलेले, आवाज खोल गेलेला, नैराश्याची बरीचशी लक्षणे त्यात दिसून येत होती. तो सारखा काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता.

… आणि तो मोकळा झाला Read More »

सावर रे

  लग्नानंतर काही महिन्यातच एकत्र कुटूंबात होत असलेल्या वादामुळे विजयची पत्नी माहेरी निघून गेली. तिला चांगल्या पगाराची कायम स्वरूपी नोकरी असल्यामुळे तिने व तिच्या घरच्यांनी विनयचा प्रचंड अपमान करून नाते संपुष्टात आल्याचे विनयला सांगितले. या गोष्टीचा विनयच्या मनावर तीव्र आघात झाला. त्याने स्वतःची मालमत्ता, घर, दुकान वगैरे भावाच्या ताब्यात दिले व विनय नोकरीच्या जवळच घर

सावर रे Read More »

विनम्रता

सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, जिसके मन में प्रज्ञा जगी होय विनम्र विनित। जिस डाली को फल लगे झुकने कि है रीत।। मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्लीनला विचारले. “आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची

विनम्रता Read More »

सद्गुण आणि निती

रामानंद नावाचा एक अध्यात्मिक युवक साधनेसाठी आश्रमात दाखल झाला. गुरूने त्याला दीक्षा देऊन गुरूमंत्र दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाच्या मैदानावर ३००-४०० गावकऱ्यांना गोळा करून रामानंद “ॐ-ऐं-ही-क्ली-फट स्वाहा” हा मंत्र जोरजोराने त्यांच्याकडून वदवून घेत होता. तेवढ्यात गुरूजीचे तेथे आगमन झाले. त्यांनी हा प्रकार पाहून रामानंदला बोलावून विचारले हा काय प्रकार आहे ? रामानंदने सांगितले, गुरूजी तुम्ही

सद्गुण आणि निती Read More »

अध्यात्म

तुकाराम महाराजांचे प्रवचन ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांना वाटले, “भक्ती” हेच जीवनाचे परमउद्दीष्ट असेल तर मग कशाला लढाया करायच्या, चित्तशुद्धीसाठी महाराज तासनतास भवानी मातेच्या मंदिरात जाऊन ध्यान करत बसू लागले. माता जिजाऊने आठवडाभर हे दृश्य न्याहाळले व एक दिवस त्या महाराजांच्या शेजारी महाराज ध्यान करत असताना येऊन बसल्या व रडू लागल्या. शिवाजी महाराजांनी डोळे उघडून माँसाहेबांना अश्रू

अध्यात्म Read More »

कुछ तो लोग कहेंगे (जननिंदा)

अभिजित हा सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्चकुलीन राजघराण्यातील नामांकित युवक, लग्न लवकरच झाल्याने त्याला संततीही लवकरच झाली. संस्कारक्षम घर पण त्याला दृष्ट लागली. अभिजितच्या एकुलत्या एका मुलीने पळून जाऊन घरच्यांना कळू न देता परजातीतील मुलाशी रजिस्टर्ड विवाह केला व ती त्याच्याबरोबर राहू लागली. या घटनेमुळे नातेवाईक, सोसायटी आणि कारखान्यामध्ये या गोष्टीची चर्चा भलतीच रंगू लागली. या लोकनिदेच्या

कुछ तो लोग कहेंगे (जननिंदा) Read More »

अरे संसार संसार

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, “बायको तुझी गोरी गोरी बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी हाती देईल तुरी”।। गाणं ऐकून राहुलची आठवण झाली. राहूल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा सधन कुटूंब – वडील सरपंच, घराण्याचा रूबाब, प्रतिष्ठा, पुर्वापार घराण्याने जपलेली संस्कृती, माय-लेकांचे एकमेकांवर अतोनात प्रेम. राहूल

अरे संसार संसार Read More »

error: Content is protected !!