जादू की झप्पी
रमेश अमेरिकेला गेल्यापासून रमेशची आई संपूर्ण बंगल्यात एकटीच असायची. वडीलांचे निधन होऊन ५ वर्षे लोटली होती. रमेशला आईला अधून- मधून फोनही करायचा फोनवर सुनबाई व नातीशी मनसोक्त गप्पा व्हायच्या. रमेश महिन्याला आईसाठी तिच्या अकाऊंटला २० हजार रुपये पाठवायचा. त्याने सांगितल्याप्रमाणे मी साफसफाई-स्वयंपाक व धुण्याभांड्यासाठी एका बाईला बंगल्यावर – रमेशच्या आईला मदत करण्यासाठी नियुक्त केलं
